वणीचे ट्रामा केअर युनिट धूळखात! राजकीय नेते शिबिरात मग्न?
वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील वणी ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर युनिट मंजूर होऊन बांधकाम पूर्णत्वात आले आहे. यात एक्स-रे यंत्र,व विविध उपकरणे लावण्यात आली असतांना येथील ढिसाळ प्रशासन व लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्षित धोरणाने येथील ट्रामा केअर युनिट सध्यातरी धूळखात आहे. यातच रुग्ण कल्याण समिती स्वताच चांगभलं करण्यात व्यस्त असल्याने सामान्य जनतेला विदर्भातील चंद्रपूर, वर्धा,नागपूर येथे रुग्णांना उपचार करण्याची वेळ आली असतांना शासन व प्रशासन चिरीमिरी मध्ये व राजकीय आसरा घेतांना दिसते आहे. परिणामी ग्रामीण भागातील सामान्य जनतेला वेळीच उपचार मिळत नसल्याने कोत्येक रुग्ण दगावल्याच्या घटना बघतो आहे. यावर जनतेची मते व राजकीय नेते यांचे मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता.सत्ताधारी व विरोधातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले असल्याचा अनुभव आला आहे. मग सामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविणारे अधिकारी व नेते भ्रष्ट आहे की, काय? असा प्रश्न उपस्थित होते आहे. Wani's trauma care unit in the dust! Involved in the political leader camp?
यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे शहर ब्लॅक डायमंड सिटी या नावाने ओळखल्या जाते. या परिसरात असंख्य कोळसा खाणी,त्यावर चालणारे उद्योग भरपूर प्रमाणात असल्याने देशातील विविध भागांतील लोक येथे वास्तव्यास आहे. मागील काळात वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा देण्याचा प्रस्ताव असतांना येथे दर्जा मिळाला नाही. हीच खरी शोकांतिका आहे. यातच वणी येथे ट्रामा केअर रुग्णालयाची सुसज्ज इमारत सज्ज झाली आहे. यात विविध उपकरणे लावण्यात आली आहे. मात्र ट्रामा केअर युनिट मध्ये रुग्णांवर उपचार होतच नसल्याचे बरेच रुग्ण सांगताहेत. येथील वैद्यकीय अधीक्षक धर्मेंद्र सुलभेवार यांना विचारणा केली असता.शासनाने पुरेसे मनुष्यबळ पुरविले नसल्याचे भ्रमणध्वनिवरून बोलतांना सांगितले आहे. मग गेल्या दहा वर्षात तयार झालेले ट्रामा केअर युनिट लोकप्रतिनिधी व शासनाच्या दुर्लक्षित धोरणाने धूळखात असल्याचे बघायला मिळते आहे. इतकेच नव्हे तर वैद्यकीय अधीक्षक यावर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. यात ते राजकीय आसरा घेत तर नसावे ना? मात्र या प्रकारणे जनता हैराण झाली असल्याचे चित्र दिसते आहे.
साडेसात वर्षात रुग्णकल्यानं समितीच्या बैठका घेतल्या की,नाही?
गेल्या साडेसात वर्षांपासून राज्यात भाजप प्रणित महायुतीचे सरकार आहे. यातच गेल्या दहा वर्षात भाजपचे आमदार येथील लोकप्रतिनिधी आहेत. मात्र त्यांनी ट्रामा केअर साठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याने येथील ट्रामा केअर केंद्र धूळखात असल्याचे यावरून स्पष्ट होते आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेशी भ्रमणध्वनिवरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही हे विशेष! त्यानंतर भाजपचे नेते विजय बाबू चोरडिया फोन उचलला नाही. व माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी सुद्धा मी रुग्णालयात आहो असे सांगितले. यावरून सत्ताधाऱ्यांना सामान्य जनतेच्या आरोग्याचे काहीच देणेघेणे नाही असे दिसून येते आहे.
एकूणच शासनाकडून मिळणाऱ्या आरोग्य सेवेचे पुढारी लोणीच खातेय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला वर्धा,चंद्रपूर,नागपूर, मेघे सावंगी येथे नाहक त्रास घेत रुग्णांना उपचारासाठी न्यावे लागते हीच खरी शोकांतिका आहे.
रुग्णकल्यानं समितीच्या बैठका घेतल्या की,नाही?
मागील साडेसात वर्षात महायुतीचे सरकार राज्यात आहे. यात जवळपास तीन बैठका घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे. या बैठकीत रुग्णांना आहार,औषधे, इतर रुग्णालयात हलविण्याचा खर्च व प्रशासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा लेखाजोखा असतोच. मग रुग्णकल्यानं समितीच्या बैठका होत असताना. विद्यामम आमदार,सार्वजनिक बांधकाम अभियंता, गटविकास अधिकारी व इतरांनी डोळे मिटून सर्व देयके प्रदान केली की,काय? असा प्रश्न आवर्जून उपस्थित होतो आहे. एकूणच अडीच वर्षातील घालमेल व लोकप्रतिनिधी चे याकडे दुर्लक्ष होत असल्याने, दस्तुरखुद्द आमदारांना आरोग्य शिबीर घेण्याची वेळ तर आली नसेल ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचे आवर्जून टाळले असावे असा अंदाज आहे.
शासन प्रशासनाचे दुर्लक्ष!
वणी परिसर खनिज संपत्तीने नटलेला आहे. येथे देशातील मोलमजुरी करणारे कामगार,व स्थानिक मजूर,शेतमजूर,गोरगरीब शेतकरी आहेत. वणी येथे ट्रामा केअर केंद्र असतांना येथील रुग्णांना इतर जिल्ह्यात हलविण्यात येथे हेच खरे दुर्दैव आहे. यासाठी सत्ताधारी पक्ष,शासन व प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहेत.
संजय देरकर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी विधानसभा प्रमुख
गेल्या कित्येक वर्षांपासून केंद्र बंदच!
महाविकास आघाडी शासनाने कोरोना काळात वणीतील ट्रामा केअर केंद्रात रुग्णांची व्यवस्था करण्यात केली होती. पण त्यानंतर या केंद्रात केवळ लसीकरण मोहीमच राबविण्यात आली. येथे लाखो रुपयांचे उपकरणे पडलेले आहेत. पण त्याचा वापर कोणीही करतांना दिसत नाही. त्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांनी पाठपुरावा केला की नाही. हाच खरा प्रश्न आहे?
प्रा. टिकाराम कोंगरे
माजी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा सहकारी बँक.
शासन व लोकप्रतिनिधींची अनास्था!
वणी परिसरात राजकीय पक्षाच्या लोकांना आरोग्य शिबिरे घेण्याची वेळ आली असेल तर, याला मुख्य कारण वणीचे ग्रामीण रुग्णालय आहे. परिसरातील लोकांना धड आरोग्य सेवा मिळत नाही.हे शासनाचे व येथील अकार्यक्षम लोकप्रतिनिधी चे गुंतलेले दुर्दव आहे. जनतेला सोई सुविधा उपलब्ध करून देण्यास येथील लोकप्रतिनिधी व शासन अपुरे पडले हेच म्हणावे लागेल!
संजय खाडे{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
संचालक,पणन महासंघ.