ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा संविधान चौकात चेंदामेंदा.
वणी:- संविधान चौकात वरोरा मार्गाने येणाऱ्या दुचाकीस्वारास लालपुलिया कडून येणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना बुधवारी ५ जानेवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. A-bike-rider-was-injured-in-a-truck-collision-at-Samvidhan-Chowk.
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वरोरा मार्गावरील संविधान चौकातील वळणावर वरोरा मार्गाने येणाऱ्या दुचाकीस्वारास लालपुलिया कडून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या पोटावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा पुरता चेंदामेंदा झाला आहे. सध्यातरी दुचाकीस्वाराची ओळख अद्याप पटली नाही. मृतकाचे अंदाजे वय ३५ असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. धडक देऊन ट्रक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.