चंद्रपुरातील हॉटेलात हाजी अली वर बेछूट गोळीबार.
वणी:- चंद्रपूर जिल्ह्यातील घुघुस येथील कोळसा तस्करीत असलेल्या हाजी अली सरवर याच्यावर बिनबा गेट जवळील हॉटेलात अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. यात हाजी अली चा मृत्यू झाल्याचे कळते आहे.Random firing on Haji Ali in a hotel in Chandrapur.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुगूस येथील कुख्यात कोळसा तस्करीत अग्रेसर असलेल्या हाजी अली सरवर याच्यावर बिनबा गेट जवळील हॉटेल शाही दरबार येथे दुपारचे सुमारास जेवण करीत असताना अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती मिळते आहे.
टोळी युद्धातून ही घटना घडल्याचे समजते आहे. मागील काळात त्याच्या टोळीची वणी परिसरात सुद्धा दहशत होती. जुन्या टोळी वैमनस्यातून सदर घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. अशा अनेक घटनांनी कित्येकदा तो कारागृहात होता.