२२ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू.
वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निळापूर येथील २२ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार २८ डिसेंबर ला दुपारी दीड वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे. A-22-year-old-youth-drowned-in-a-lake.
तालुक्यातील निळापूर(ब्राम्हणी) येथील निलेश लक्ष्मण मंगाम हा २२ वर्षीय युवक काही मुलांसोबत तलावात पोहायला गेला होता. पोहता पोहता तो पाण्यात बुडाला, सोबत्यांनी आरडाओरडा केला. निलेश ला ग्रामस्थांनी पाण्यातून बाहेर काढले. व लागलीच वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालय प्रशासनाने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी निलेश ला मृत घोषित केल्याची घटना घडली आहे.
निलेश हा स्वतःच्या मालकीचे मालवाहू वाहन व ट्रॅक्टर चालवीत होता. त्याच्या पश्चात दोन बहिणी आईवडील आहे.