या घरगुती उपायाने होणार आठ दिवसात तीन किलो वजन कमी.

0


या घरगुती उपायाने होणार आठ दिवसात तीन किलो वजन कमी.


वणी:- सध्याच्या परिस्थितीत अनेकांना वजन वाढल्याच्या समस्या आहेत. पोटाचा वाढलेला घेर, त्यावर साचलेली चरबी, यामुळे विविध आजार उद्भवतात, त्यासाठी एका आठवड्यात तीन किलो वजन कमी करण्यासाठी एक सोपा आणि सुरक्षित उपाय खास आपल्यासाठी! With this home remedy, you will lose three kg of weight in eight days.
या घरगुती उपायाने होणार आठ दिवसात तीन किलो वजन कमी.


    अनेक पुरुष व महिलांचे वजन सतत वाढत असते. प्रत्येकाला वाटत की,आपलं शरीर सुदृढ व निरोगी असावं, वजन वाढल्याने अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. शरीरात वाढलेली चरबी,त्यामुळे होणारे आजार अशा अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यासाठी आपण ना-ना तर्हेचे उपाय करून बघतो. जर आपल्याला पोटाचा घेर व वाढलेलं वजन कमी करायचे असेल तर, एकदा घरगुती उपाय करून बघा.
     यासाठी पाच चमचे ओवा, काळे जिरे दोन चमचे, मेथी दाणे पाच चमचे, दोन छोटे छोटे तुकडे कलमी चे घ्या. वरील मसाले गॅसवर कढई ठेऊन मंद आचेवर दोन मिनिटे भाजून घ्या. त्यानंतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये नीट चूर्ण तयार होईपर्यंत करा. तयार झालेल्या चूर्णात तीन चमचे त्रिफळा चूर्ण मिसळून घ्या. त्यानंतर या तयार झालेल्या चूर्णात सत-इसबगोल चूर्ण दीड चमचे म्हणजेच साधारणतः १५ ग्रॅम मिसळून एका काचेच्या भरणीत भरून ठेवा.
     व रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा तयार केलेले चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यात दोन मिनिट पर्यत मिसळून घ्या व ते मिश्रण प्या. अवघ्या आठ दिवसात आपल्याला साधारणतः तीन किलो वजन कमी झालेले दिसेल. व पोटावरची चरबी पण वितळून जाण्यास मदत होईल.

     यातील त्रिफळा चूर्ण व सत-इसबगोल हे औषधीच्या दुकानात सहज उपलब्ध होते. हा घरगुती उपाय असल्याने कोणतेही दुष्परिणाम होणार नाही. तसे वाटल्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा. तसे बघता वरील साहित्य आपण नेहमीच्या आहारात वापरत असतोच. बघा एकदा करून. घरगूती उपाय.


वरील उपाय करणे अथवा न करणे हे आपल्यावर अवलंबून आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top