सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या.

0


सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या.


वणी(यवतमाळ):- शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ढाकोरी येथील २३ वर्षीय युवा शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ३ ऑक्टोबर ला उघडकीस आली आहे. A young farmer commits suicide due to constant barrenness.
सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या.


     तालुक्यातील ढाकोरी येथील विजय सुरेश सातपुते असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. परिणामी कुटुंबाची जबाबदारी विजय वर आली. गेल्या तीन वर्षांपासून विजय शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. स्वतःची काही शेतजमीन व त्याला जोड म्हणून ठेक्याने शेती करीत होता. यावर्षी पडलेल्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने तो सतत चिंतेत होता. त्यातच नुकतेच शासनाचे हेक्टरी पाच हजार रुपये मिळविण्यासाठी कागदपत्रे गोळा करीत होता. संयुक्त शेती असल्याने सदर अनुदान मिळणार की,नाही. असे त्याला वाटत होते.
      सततची नापिकी, पावसाने झालेले नुकसान, त्यात मागील वर्षीची पीककर्ज परतफेड केली. मात्र नवीन कर्ज त्याला मिळाले नसल्याचे समजते. याच विवंचनेत असतांना विजय ने ३ ऑक्टोबर ला रात्री १० वाजताचे सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. यासंबंधी माहिती मिळताच नातेवाईक व शेजाऱ्यांनी त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र ४ ऑक्टोबर ला रात्री ११ वाजताचे सुमारास विजयची प्राणज्योत मालवली. अत्यल्प वयात शेतीची व कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या युवा शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. आणि जीवनयात्रा संपवली. परिणामी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top