-->

चिलई-तेजापूर रस्त्यासाठी साखळी उपोषणाचा सहावा दिवस

0

चिलई-तेजापूर रस्त्यासाठी साखळी उपोषणाचा सहावा दिवस 

वणी: मुकूटबन पासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या गणेशपुर, चिलई व तेजापुर रोडवर गणेशपुर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल्वे पुलाजवळ १ ऑगस्ट गुरुवार पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा सहावा दिवस असून अनेक पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिलीआहे. मात्र कोणताही तोडगा कंपन्यांकडून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निघाला नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांना पावसाचा व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. PWD ने उपोषणकर्त्यांना वाऱ्यावर सोडले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.Sixth day of chain hunger strike for Chile-Tejapur road

चिलई-तेजापूर रस्त्यासाठी साखळी उपोषणाचा सहावा दिवस

PWD ने उपोषणकर्त्यांना सोडले वाऱ्यावर 

मागील ३ वर्षांपूर्वी मौजा तेजापूर, चिलई व गणेशपुर हा रस्ता अतिशय चांगल्या स्थितीत होता. परंतु मध्यंतरी काळात या भागातील तीन कंपनीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे पूर्णतः रस्ता खराब झाला असून या कंपनीमध्ये ३० ते ५० टन क्षमता असणाऱ्या ट्रकची वाहतूक चालू असल्याने रस्त्याची राखरांगोळी झाली आहे. हा रस्ता मागील वर्षी सिमेंट काँक्रेटचा रस्ता बनवून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे निवेदनातून तेजापुर व चिलई ग्रामस्थांनी केली होती परंतु त्या ठिकाणी मुरूम टाकून थातुरमातुर खड्डे बुजविण्याचे कामे करण्यात आले.

 गणेशपूर, चिलई व तेजापूर या रस्त्यावर तीन कंपनीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्ड्यातूनच रस्ता बनवला की काय असे दिसून येते. रस्त्यावरून ये जा करणाऱ्याचे खूप मोठे हाल होत आहे. स्कूल बस बंद झाली आहे त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सुध्दा खूप त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी, शेतमजूर आणि इथल्या गावकऱ्यांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाला झरी जामणी तालुका काँग्रेस पक्षाचे व वसंत जीनिंग वणीचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, सुरेंद्र गेडाम, गणेश बेलेकार, प्रदीप भोयर, संदीप ढेंगडे, व इतरांनी उपोषण मंडपी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. चिलइचे सरपंच अनुप बोबडे, तेजापुरचे उपसरपंच आशिष मालेकार, पोलीस पाटील महादेव बोबडे, बाबाराव पेटकर, खुशाल सहारे, महादेव बोबडे, राहुल पावडे, संदीप आसुटकार, आशू पानघाटे, दादाजी लडके, शिवा झाडे, उत्तम सोमनकार, शालिक मेश्राम, महेश बरडे, जीवन आसुटकार, सुधाकर बरडे, राजू लोडे, पद्माकर गीरसावळे, विजय मालेकार व इतरांनी साखळी उपोषणाला बसले आहेत.


रस्त्याची दुरुस्ती व सिमेंट काँक्रिटिकरण त्वरित कंपन्यांनी करून द्यावे, यासाठी २३ जुलैला तेजापूर, चिलई ग्रामपंचायत ने तीन कंपन्यांना व खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी वणी, तहसीलदार झरी जामणी, पोलीस निरीक्षक मुकूटबन, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी यांना निवेदन दिले होते परंतु मागण्या मान्य न झाल्यामुळे त्यांनी १ ऑगस्ट पासून आंदोलन चा भाग म्हणून साखळी उपोषण सुरू केले आहे. 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top