नवरगावच्या सरपंच एसीबीच्या जाळ्यात
वणी:-/ उपविभागातील मारेगाव पंचायत समितीचे कार्यक्षेत्रात येत असलेल्या नवरगाव (धरण)येथील महिला सरपंच यांनी कंत्राटदारा कडून लाच लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. Sarpanch of Nawargaon in the net of ACB 
नवरगावच्या सरपंच एसीबीच्या जाळ्यात
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नवरगाव येथील सरपंच सुचीता कुमरे यांनी शाळेच्या संरक्षण भिंत बांधकामाचे बिल काढण्यासाठी धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी ८० हजार रुपयाची मागणी केली होती. संबंधित कंत्राटदारांनी लोकसेवक सरपंच कुमरे यांचे विरोधात लाचलुचपत विभाग यवतमाळ यांचे कडे तक्रार दाखल केली होती. परिणामी एसीबीच्या सापळ्यात सरपंच अडकल्याची घटना उघडकीस आली आहे.
मारेगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचे सरपंच विकास कामाच्या कमीशनखोरीने बरबटले आहे. लोकसेवक असतांना गावातील विकास कामात जास्त कमीशन देणाऱ्या कंत्राटदारांना कामे देण्याचा सपाटा सुरु करण्यात आला आहे. या कमीशनखोरीने गावातील विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार होतांना दिसतें आहे.
याचाच अनुभव नवरगाव येथे आला आहे.
नवरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम पुर्ण झाले होते. बांधकामाचा तीन लाख एकशे ६० रुपयाचा एक, तर तीन लाख दोनशे ३० रुपयाचा दुसरा असा एकुण सहा लाख तीनशे ९० रुपयाचा धनादेश तयार करण्यात आला होता. मात्र या धनादेशावर सही करण्यासाठी येथील सरपंच कुमारी सुचीता फुलु कुमरे यांनी कमीशन पोटी ८० हजार रुपयाची मागणी केली होती. याची रितसर तक्रार बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांनी लाचलुचपत विभाग यवतमाळ यांचे कडे केली होती.
सर्व पडताळणीत सरपंच यांनी ८० हजार रुपयांची लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी त्यांचे विरोधात मारेगाव पोलीसात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे.
या यशस्वी कारवाई मध्ये अमरावती परिक्षेत्राचे अॅन्टी करप्शन ब्युरो चे पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे,पोलीस उप अधिक्षक अभय आष्टेकर,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट,पोलीस अंमलदार पोहवा अतुल मत्ते,अब्दुल वसीम सुधीर कांबळे,जयंत ब्राम्हणकर,संजय भुजाडे, पोना, सचीन भोयर,मपोशी,सारीता राठोड, चालक पोना.अतुल नागमोते, यांनी केली आहे. या कार्यवाही मुळे सरपंच,सचिव गोटात एकच खळबळ उडाली आहे. असे अनेक प्रकार वणी ,झरी,मारेगावात सुरू आहे.
