-->

चिखलगावच्या युवकांनी दादा, भाऊला लावले कामाला

0

 चिखलगावच्या युवकांनी "दादा, भाऊ" ला लावले कामाला.


आंदोलनाला सुरवात, आमदार खासदार शब्द पाळणार का?


वणी:-/  चिखलगावात भाऊ,अन दादा या दोघांच्या जवळीक असलेल्या लोकांनी गावातील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले असल्याचा आरोप करीत गावातील युवकांनी बंड पुकारले आहेत. आज सोमवारी राजकीय व्यवस्था व प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारत उपोषणाचे हत्यार उपसत आंदोलन छेडले आहे.  आता युवकांना आश्वासन देणारे आमदार खासदार खरच उपोषणस्थळी भेट देऊन समस्यांचे निराकरण करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. The youth of Chikhalgaon put "Dada, Bhau" to work.

चिखलगावच्या युवकांनी "दादा, भाऊ" ला लावले कामाला.
चिखलगावच्या युवकांनी "दादा, भाऊ" ला लावले कामाला.


     वणी शहरालगत अन शहरातील जणू भागच असलेली मोठी ग्रामपंचायत येथे सद्यस्थितीत शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सध्या विधानसभा प्रमुख असलेले सुनील कातकडे यांची सत्ता आहे.  तर भाजपचे तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती संजय पिंपळशेंडे हे दोघे गावचे "भाऊ,दादा" गावाचा विकास करण्याचे ढोंग करीत युवकांना नादी लावून गावात झालेल्या अतिक्रमण याला जणू पाठबळ देत असल्याचा आरोप करीत युवकांनी दोघांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत एल्गार पुकारला आहे.


     चिखलगाव म्हणजे भ्रष्टाचाराची खाण. पुणे लुटायचे अन साताऱ्याला दान करायचे. या म्हणींप्रमाणे येथे भाऊ दादा काम करत आहेत. असा आरोप गावातील युवकांनी करत वारंवार अतिक्रमण विषयांवर निवेदने ,तक्रारी दिल्या आहेत.  ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वाक्षरी केली असतांना एकाच घरातील सरपंच उपसरपंच यांनी स्वाक्षरी केलीच नाही. म्हणजेच आजघडीला गावातील अतिक्रमण वाढण्यात यांचाही वाटा असणार हे यावरून स्पष्ट होते आहे. The youth of Chikhalgaon put "Dada, Bhau" to work.

शिवसेनेचा विधानसभा प्रमुख?


    शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख सुनील कातकडे विधानसभा क्षेत्रात कधी संघटन करतांना दिसलेच नाही.  याआधीही ते संघटक होते.  केवळ राजकीय क्षेत्रात स्वतःच्या कुटुंबातील व  आपल्या हाताखाली कोण राहील. असे राजकारण सर्वश्रुत आहे.  केवळ स्वतःचा व्यवसाय चालविण्यासाठी पक्षाचे पदे घ्यायची अन गावाला वेशीवर टांगण्याचा यांचा जणू छंदच असल्याचे यावरून दिसते आहे.   म्हणूनच बाहेरून आलेल्या लोकांना पाठबळ देत गावाला वेशीवर टांगणारे हे सेनेचे विधानसभा प्रमुख म्हणावे का? असा प्रश्न चिखलगावातील युवकांनी केला आहे.


चिखलगावचा गोडबोल्या दादा?

 

    सुनील कातकडे यांच्या पॅनल मधून प्रथमतः निवडून येऊन उपसरपंच पद घेणारा, अन भाजप सारख्या संस्कारी पार्टीचा तालुकाध्यक्ष  त्या नंतर वणी पंचायत समितीचे सभापती पद भूषविणारा दादा म्हणजेच संजय पिंपळशेंडे.  हा भाजपचा गोडबोल्या नेता.  यांनी गावासाठी काहीही केले नाही. उलट माजी आमदारांचा हस्तक असल्याचे गाजर गेली अकरा वर्षे चिखलगाव वासीयांना दिले.

 गावातील सामान्य माणूस घरी कामासाठी गेला तर घरी असून घरीच नाही असे सांगणारे माजी सभापती.  ज्या मातीत जन्मलेले त्या मातीचे मोल विसरत आहेत.  यावरून स्वतःचे घर कसे मोठे होईल.  यासाठीच गावाला वेशीवर टांगणारा दादा आहे. असे आरोप युवकांनी करीत यांच्याविरोधात बंड पुकारत आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत.

आंदोलनाला सुरवात, आमदार खासदार शब्द पाळणार का?


     गावातील युवकांनी भाऊ दादांच्या एकसूत्री कार्यक्रमाला कंटाळून गावातील अतिक्रमण हटविण्याची सर्वांना विनंती केली.  जेव्हा प्रशासकीय अधिकारी राजकीय दबावात वावरतांना दिसले. तेव्हाच युवकांनी बंड पुकारत विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर आणि विद्यमान आमदार संजय देरकर यांची भेट घेत गावातील व्यथा कथन केली.  आमदार खासदारांनी युवकांना आश्वासन देत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.  आता प्रश्न असा आहे की, विद्यमान आमदार,खासदार आंदोलनस्थळी भेट देऊन मार्ग काढणार की, गावपुढाऱ्यांची पाठराखण करणार हे बघणे महत्वाचे आहे.


    चिखलगावात दादा,भाऊंची हुकूमशाही


गेल्या कित्येक वर्षात भाऊंनी उगवत्या सूर्याला नमस्कार करीत पक्ष बदलले, अन दादाचा शब्द तर गावाला मेजवानी.  यावरूनच दोघे भाऊ मिळून खाऊ अशी रणनीती आखणारे दोघेही आक्रमक युवकांचा रोषाला कसे समोर येणार हे या आंदोलनात दिसणार आहे.  जनतेला दहा टक्के खर्च करून स्वतःचा पीआर करणारे हे दोघे चिखलगाव ची वाट लावायला निघालेत 

की, काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.  तूर्तास यावर विद्यमान आमदार तोडगा काढणार की, गावपुढाऱ्यांची पाठराखण करणार?  ही वेळच ठरविणार आहे.


युवक बसले उपोषणाला.


ग्रामपंचायत व गावपुढाऱ्यांनी अतिक्रमण विषयाला पाठबळ दिल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास होतो आहे.  याविरोधात गावातील सुज्ञ युवकांनी पुढाकार घेत,तक्रारी,निवेदने केली आहेत.  मात्र प्रशासनाने राजकीय नेत्यांच्या दबावाखाली निवेदनाला जणू केराची टोपली दाखविल्याने  सोमवार ३ नोव्हेंबर ला चिखलगावातील युवकांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top