-->

वणी-घुग्गुस महामार्गावर भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा, तिघींचा मृत्यू

0

 वणी-घुग्गुस महामार्गावर भीषण अपघात,

कारचा चेंदामेंदा, तिघींचा मृत्यू



वणी / :-  वणी-घुग्गुस मार्गावरील लालगुडा गावाजवळ एका कार ला ट्रकने जबर धडक दिल्याने कार मध्ये बसलेल्या तिघींचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजताचे सुमारास घडली आहे. Terrible accident on Wani-Ghuggus highway, car overturns, three dead

वणी-घुग्गुस महामार्गावर भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा, तिघींचा मृत्यू
वणी-घुग्गुस महामार्गावर भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा, तिघींचा मृत्यू


    शहरातील भीम नगर भागातील  रियाज भाई हे गॅरेज चालवितात.  शुक्रवारी गॅरेज बंद असल्याने त्यांनी मुलींना कार चे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःची मुलगी व भावाच्या मुलींना घेऊन वणी- घुग्गुस राज्य महामार्गावर वाहन प्रशिक्षण देत असतांना अचानक त्यांच्या वाहनाला ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत रियाज यांच्या कुटुंबातील तीन मुली ठार झाल्या.   रियाजभाई व एक मुलगी  गंभीर जखमी झाली.  दोघांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. 

     

एकाच कुटुंबातील तिघींचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी


गॅरेज चालविणारे रियाज भाई हे स्वताच्या व भावाच्या मुलींना कार चालविण्याचे प्रशिक्षण देत असतांना कारचा भयावह अपघात घडला.  यात स्कोडा एम एच 1 ए एच 5700 ही कार  रियाज भाई ची २० वर्षीय मुलगी लीयाबा चालवीत होती. व मागे तीन बहिणी बसल्या होत्या.  आणि लियाबा च्या बाजूला रियाज भाई बसून होते. या भयावह अपघातात तिघीचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असून कार चा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.  या भीषण अपघाताने रियाज भाई च्या कुटूंबावर शोककळा पसरली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top