शारीरिक थकवा जाणवतोय? करून बघा हे उपाय.
यातील कोणताही एक उपाय करून बघा.
दिवसेंदिवस माणसाच्या सवयी बदलत आहेत. आजकल धकाधकीच्या जीवनात आमूलाग्र बदल होतांना दिसते आहे. खाण्यापिण्यात केमिकल चा नकळत होणारा वापर. त्यामुळे अनेकांना असाध्य आजारांना सामोरे जावे लागते आहे. ऐन तारुण्यात अनेकांची शारीरिक क्षमता कमी होतांना दिसते आहे. परिणामी ते दूर करण्यासाठी केमिकल्स असलेले औषधे घेऊन तात्पुरता उपचार अनेक लोक करतात. मात्र पूर्वी असे आजार क्वचितच बघायला मिळायचे. त्याचे कारणही तसे आहे. पूर्वीचे लोक कोणतेही रासायनिक प्रक्रिया न केलेले अन्न ग्रहण करीत होते.औषध म्हणून अनेक झाडांची फळे,पान फुले, कंदमुळे यांचा बहुतांश वापर करायचे म्हणूनच त्यांची अंगकाठी छान होती. आता सगळीकडे रासायनिक प्रक्रिया केलेले अन्नधान्य, फळे,तेल दैनंदिन वापरात आले आणि समस्यांना तोंड फुटले. यासाठी आपण घरगुती उपाय म्हणून काही उपाय बघणार आहोत.
शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी उपाय. Feeling-physically-tired.-Then-try-these-home-remedies.
1. प्रसाद तयार करतो तसा रवा भाजून त्यात खडी साखर घालायची व मध घालून लाडू तयार करायचे. व रोज सकाळी उठल्यावर एक खायचा.(पुरुष महिलांसाठी उपयुक्त
2. लसूण घ्यायचा,त्याला तव्यावर भाजून घ्या. नंतर पाकळ्या वरील साल काढून त्या लसूनचे बारीक बारीक तुकडे करायचे. व ते मधात टाकून ठेवा. ते मिश्रण दिवसातून दोन वेळा एक एक चमचा घ्या. उपाशीपोटी फायदेशीर.
3. चार लवंग, दोन विलायची, एक कलमी चा तुकडा, एक चिमूटभर हळद, यांचे मिश्रण एक ग्लास पाण्यात छान उकळून घ्या आणि ते पाणी दिवसातून दोन वेळा रोज घेतल्यास पूर्ण थकवा नाहीसा होईल. एकाच दिवसाच्या सेवनाने फरक जाणवेल.
4. चार ते पाच खजूर बी , 5 ग्राम शतावरी चूर्ण,तीन ग्रॅम अश्वगंधा चूर्ण,दुधात उकळून घेतल्यास दोन दिवसात फायदा जाणवेल.
5. वडाचे पान, त्यातून निघणारे दूध. मग एक बत्ताशा घ्यायचा त्यात पहिल्या दिवशी एक थेंब वडाच्या पानातून निघालेले दूध घालायचे. व तो बत्ताशा चावून चावून खायचा. पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन, तिसऱ्या दिवशी तीन असे एकवीस थेंब घ्यायचे. त्यानंतर परत कमी कमी करत 42 दिवसाचा हा उपाय केल्यास शरीरात मोठा बदल झालेला दिसेल.
6. चिंचेच्या बिया(चिंचुके) घ्या ते चिंचुके रात्रभर गरम पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्या चिंचुक्या वरील साल काढून टाका. जितके चिंचुके तितकाच गूळ घालून त्याला छान वाटून घ्या. आणि त्या मिश्रणाच्या बोरा एवढ्या गोळ्या तयार करा. रोज दोन गोळ्या दोनदा घेतल्यास शारीरिक क्षमता वाढते. नपुंसकत्व, गर्भाशय, वीर्य, यावर उपाय आहे.
स्रोत :- समाजमाध्यम(घरगुती उपाय)

.jpg)