अनुसूचित जाती ,जमातीच्या तेवीस महिला होणार नगराध्यक्षा
वणी अनुसूचित जमाती महिला राखीव
संगिनी न्युज :- राज्यातील २४७ नगर परिषदा,१४७ नगर पंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात १७ नगर पालिका मध्ये अनुसूचित जातीच्या महिला नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार आहे. तर सहा पालिकेवर अनुसूचित जमाती च्या महिला विराजमान होणार आहे. Twenty-three women from Scheduled Castes and Scheduled Tribes will be elected as mayors
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी महिन्याच्या आधीच घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्यातील नगर पालिकांची आरक्षण सोडत आज घेण्यात आली. यात ३३ नगर पालिकांपैकी खालील १७ नगर पालिका मध्ये अनुसूचित जाती महिला राखीव आरक्षण निघाले आहे.
१७ नगर पालिकेवर अनुसूचित जाती महिला राज
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगरपालिकांमध्ये
१शिरोळ, २ देऊळगावराजा, ३ मोहोळ, ४ तेल्हारा, ५ ओझर, ६ वानाडोंगरी, ७ भुसावळ, ८ घुगुस, ९ चिमूर, १० शिर्डी, ११ सावदा, १२ मैंदरगी, १३ डिगदोहदेवी, १४ दिग्रस, १५ अकलूज, १६ परतूर, १७ बीड या नगरपालिकांचा समावेश आहे.
सहा नगर पालिकेवर अनुसूचित जमाती च्या महिला
सहा नगरपालिका या अनुसूचित जमाती (एसटी) महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामध्ये १ वणी, २ भडगाव, ३ पिंपळनेर, ४ उमरी, ५ यवतमाळ, ६ शेंदूरजना घाट या नगरपालिकांचा समावेश आहे.

