चिखलगावात चालती कार जळून खाक
वणी:-/ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चिखलगाव येथील राम नगर जवळ चालती कार गरम झाल्याने संपूर्ण कार ला आग लागली. यात कार जळून खाक झाल्याची घटना शनिवारी १ एक नोव्हेंबर ला रात्री १० चे सुमारास घडली.
A car burnt down in Chikhalgaon![]() |
| चिखलगावात चालती कार जळून खाक |
वणी शहरातील शाम दुर्गे यांची कार क्रमांक एम एच ०१ ए एल ५८३३ ही कार घेऊन चालक विलास बीमलवार हा लालपुलिया कडून वणीला येत असताना चिखलगाव येथील राम नगर परिसरात कार चे इंजिन अचानक गरम झाले. चालकाच्या लक्षात येताच त्याने वाहन थांबविले. अन क्षणात कार ला आग लागली. त्याने तात्काळ पोलीस ठाण्यात कळविले. गावातील लोकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अवघ्या काही मिनिटात अग्निशमन वाहन आले. मात्र कार पुरती जळाली होती. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

.png)