वणीत संजय देकरकरांच्या भगव्या सप्ताहाचे थाटामाटात उदघाटन!
वणी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा सप्ताह निमित्तानेवरोरा रोडवरील नंदेश्वर मंदिर श्री संत जगन्नाथ बाबा मंदिराजवळ असलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सर्व शिवसैनिक उपस्थिती होऊन प्रथम नंदेश्वर मंदिरात महाआरती करून गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हे अभियान वणी विधानसभा क्षेत्रात राबविण्याचे नियोजन वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी शिवसैनिकांच्या सहकार्याने सुरू केले आहे. Wanit Sanjay Dekarkar's saffron week opens with pomp!
सध्या महाराष्ट्राचे राजकारण जात ,धर्म, भेदभाव यात गुंतलेले आहेत. त्याच अनुषंगाने तळागाळातील गरीब,कामगार ,शेतकरी, यांच्या भल्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कोणावरही अन्याय होणार नाही. याची दक्षता घेण्यासाठी गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हे अभियान राबवित ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान राबवून गावागावात शाखा फलकाचे उदघाटन करीत युवक,तरुण यांना प्रेरित करण्यासाठी वणी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत.
भगव्या सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी माजी जिल्हा प्रमुख दीपक कोकास ,यांनी असे मत व्यक्त केले की, संजय देरकर यांचे नेतृत्व मितभाषी असल्याने शिवसैनिकांचा (शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे)यांच्यावर विश्वास ठेवून युवक आकर्षित होतांना दिसताहेत. परिणामी यावेळी वणी विधानसभा मतदारसंघात संजय देरकर यांच्या नेतृत्वाची गरज आहे.
प्रसंगी डिमनताई टोंगे यांनी,व गुहे ताई,पुष्पा भोगेकर यांनी विचार व्यक्त करतांना महिलांना सन्मान देणारे नेतृत्व केवळ संजय देरकर आहेत.
आजवर आम्ही दबावाखाली शिवसेनेचे काम करीत होतो असा महिलांना सन्मान देणारे नेतृत्व लाभले तर आमचं भाग्यच! किरण देरकर, संजय देरकर हे जनतेच्या सेवेसाठी आहेत. आणि मितभाषी नेतृत्व असल्याने आणि त्यांच्या अर्धांगिनी किरण देरकर महिलांना मदत करत असल्याने आमचं उर भरून आले आहे. यासाठीच शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर,अथवा किरण देरकर यांना शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पक्ष प्रमुख जे आदेश देतील त्या अनुषंगाने आम्ही शिवसैनिक कार्य करणार आहोत.
महिलांसाठी झटणाऱ्या किरण देरकर.!
तळागाळातील महिलांना सन्मान आणि त्यांची व्यथा जाणून घेणाऱ्या किरण संजय देरकर या अविरत सेवेत आहेत. आज गतीला महिलांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. परिणामी येत्या काळात या विधानसभेचे नेतृत्व किरण संजय देरकर करणार की, संजय देरकर करणार हे औतूसक्याचे ठरणार आहे.कार्यकर्त्यांची देरकरांना साद!
निष्ठावंत शिवसैनिक सद्यस्थितीत देरकरांचे जिगरी झाले आहेत. किरण संजय देरकर अविरत महिलांना प्रोत्साहित करते आहे. त्यातही संजय देरकर हे शिवसेना वणी विधानसभा क्षेत्रात अधिक भरभक्कम होईल त्यासाठी प्रयत्नशिल आहेत.आज रविवारी दुपारी नंदेश्वर} मंदिर येथे महाआरती करून वणी येथील जनसंपर्क कार्यालयात भगव्या सप्ताहाचा शुभारंभ केला, प्रसंगी वणी विधानसभा मतदारसंघात असेलेले देरकरांचे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देरकरांना वाढता पाठिंबा.
संजय निळकंठराव देरकर यांचे स्वतःचे वैयक्तिक मतदार आणि त्यांच्यावर प्रेम करणारे जवळपास ४० हजार मतदार आहेत. त्यातही किरण संजय देरकर यांनी महिलांच्या समस्या जाणून घेत सहकार्यांना सोबत घेऊन कार्य केले आहेत. उपेक्षित महिलांची गरज आणि आधार देत अनेकांना आधार दिल्याचे प्रसार माध्यमातून दिसले आहेत. परिणामी किरण संजय देरकर, अथवा संजय निळकंठराव देरकर हेच आमचे वणी विधानसभेचे पालक राहतील असे मनोगत मारेगावच्या डिमनताई टोंगे, पुष्पा भोगेकर, प्रथम मुरधोनी येथील आणि गुहे ताई यांनी मत व्यक्त केले.आता गाव तिथे शाखा, गाव तिथे शिवसैनिक, हे ब्रीद घेत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी झंझावात सुरू केला आहे. आता जनतेचा सहभाग संजय देरकर यांच्या बाजूने प्रबळ असल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे. या कार्यक्रमाचे संचालन नेताजी पारखी व प्रास्ताविक संतोष माहुरे यांनी केले आहे.
प्रसंगी दीपक कोकास , संजय देठे, आदींनी वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली मजबूत करण्याचे लक्ष गाठले आहेत.तालुका प्रमुख रवी बोढेकर, यांनी सुद्धा महिलांना व सर्व सामान्य घटकाला न्याय देणारे संजय देरकर यांना वणी विधानसभा मतदारसंघात प्रथम प्राधान्य आम्ही शिवसैनिक देणार! असे विचार व्यक्त करीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी बहुतांश जनतेनी शिवसेनेचे सदस्यत्व अर्ज भरून नोंदणी केली.

.jpg)