शिरपूर पोलिसांनी पकडले वेकोलीचे भंगार..
१० लाख ८५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत.
वणी((रवी ढुमणे)
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेकोली च्या उकणी कोळसा खाणीतून भंगार चोरून नेणाऱ्या वाहना सकट पोलिसांनी १० लाख ८५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. परिणामी ही सर्वात मोठी कारवाई ठाणेदार माधव शिंदे यांनी केली आहे. अनेक भंगार विक्रेते पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.Shirpur-police-caught-the-scrap-of-Wekoli..
वणी उपविभागातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उकणी कोळसा खाणीतील भंगार चोरी गेल्याची तक्रार ओमप्रकाश विनायक फुलारे वय 57 वर्ष व्यवसाय- नोकरी-उपक्षेत्रीक प्रबंधक उकणी/जुनाड वेस्टर्ण कोलफिर्ड्स लिमीटेड (WCL) रा.भालर वसाहत ता.वणी जि.यवतमाळ यांनी दिली होती.
२६ नोव्हेंबर ला रात्री 11/00 वा. सुमारास WCL उकणी विद्युत आणी यांत्रीकी विभाग उकणी येथील अंदाजे 9.5 टन वजनाचे जुने भंगार अंदाजे 30000/-रुपये प्रती टन असा एकूण किंमत 2,85000/-चा माल वाहन आयचर क्र MH/40/CM/6928 किंमत अंदाजे 10,00,000/-रु च्या साहायाने कोणीतरी चोराने चोरुन नेल्याचे त्यांना समजल्याने वेकोली चे सुरक्षा रक्षक व एम.एस.एफ चे गार्ड ने नमुद वाहणाचा परीसरात शोध सुरु केला असता त्यांना नमुद वाहन भालर येथे मिळाले वाहन चालक अतुल गजानन पिदुरकर रा. कोलार पिंपरी ता.वणी जि.यवतमाळ याचे कडे त्यांनी चौकशी केली असता त्यांने सांगीतले की, नमुदचा मुद्देमाल अनुप कुमार साही उप प्रबंधक यांत्रीकी विभाग उकणी यांनी सांगितले वरून लोडरने ट्रकमध्ये लोड करुन वणी येथील दिपक चौपाटी येथील सत्तार भाई दुकानाचे बोर्ड असलेल्या दुकानाच्या समोरील रोडचे बाजुला त्यांनी उतरविलेला आहे. अशी माहीती त्यांनी दिली.
त्यावरुन वेकोली चे सुरक्षा रक्षक व एम.एस.एफ चे रक्षक यांनी तेथे जावुन नमुदचा मुद्देमाल व वाहन त्यांनी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन शिरपुर येथे जमा केले. व अनुप कुमार साही उप प्रबंधक यांत्रीकी विभाग उकणी तसेच वाहन चालक अतुल गजानन पिदुरकर रा. कोलार पिंपरी ता.वणी जि.यवतमाळ यांचे विरुद्ध चोरीची रितसर तक्रार दिल्याने नमुद दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे. आता पुढील तपास योग्य दिशेने केला तर अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता आहे..