शेतकऱ्यांना एक कोटी ३२ लाखाचे पीककर्ज वाटप.
माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या हस्ते शुभारंभ
वणी:- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वणी शाखेत चिखलगाव ग्राम विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना एक कोटी ३२ लाख २८ हजार नऊशे रुपयांचे पीककर्ज वितरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.Crop-loan-of-Rs-1.32-crore-distributed-to-farmers.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वणी शाखेत चिखलगाव ग्राम विकास विविध कार्यकारी सहकारी संस्थेने एकशे १३ सभासदांना एक कोटी ३२ लाख २८ हजार नऊशे रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. परिणामी पीककर्ज वाटपाचा शुभारंभ चिखलगाव येथून झाला आहे. उर्वरित तालुक्यातील अनेक सहकारी संस्थेचे पीककर्ज वाटप होणार आहे. २२ एप्रिल मंगळवारी पीककर्ज वाटपाचा शुभारंभ जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या हस्ते पार पडला. प्रसंगी चिखलगाव सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र वाभिटकर, नंदुभाऊ राऊत, दिलीप पिदूरकर, सचिव चिकटे, सहायक निरीक्षक गोवारदिपे, रामचंद्र इसापुरे, प्रभाकर ढुमणे, पांडुरंग खापणे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.