शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उद्या शिवसेना (उ.बा.ठा.) चे डफडे आंदोलन
सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी वणी तहसीलवर धडकणार सेनेच भगव वादळ......
वणी :- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक असुन, यवतमाळ जिल्ह्यातील भीषण अतिवृष्टी, वारंवार होत असलेली पिकांची नासधूस आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गंभीर प्रश्नांकडे महायुती सरकारने यवतमाळजिल्ह्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे. सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी २३ सप्टेंबर मंगळवार ला खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात डफडे आंदोलन करण्यात येणार आहे. या डफडे आंदोलनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Shiv Sena U.B.A.T.A.'s Dafde agitation tomorrow for farmers' rights
डफडे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीच! : संजय निखाडे. जिल्हा प्रमुख शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष
राज्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत सरकारने जी आर काढला मात्र यवतमाळ जिल्ह्याला त्यातून वगळण्यात आल्याने शिवसेना आक्रमक झाली असुन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे डफडे आंदोलन उभारले आहे.

