-->

दूध डेअरीच्या वाहनातून सुगंधित तंबाखू तस्करी

0

दूध डेअरीच्या वाहनातून सुगंधित तंबाखू तस्करी...

१४लाख ८६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत.

वणी पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या.




वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गाडगेबाबा चौक परिसरात उभ्या असलेल्या दूध डेअरीच्या वाहनाची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता दूध डेअरीच्या नावावर सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोघांना बेड्या ठोकल्या असून १४ लाख ८६ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत मोठी कारवाई वणी पोलिसांनी रविवारी सकाळी केली आहे.Smuggling of flavored tobacco from milk dairy vehicles.



sangini news






     शहरातील गाडगेबाबा चौक परिसरात दूध डेअरीच्या वाहनात सुगंधित तंबाखू असल्याची माहिती नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार अनिल बेहरानी यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे डीबी पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे व पथकाला वाहन तपासणीसाठी पाठविले असता दूध,बिस्किटे पुरवठा करणाऱ्या वाहन क्रमांक एम एच ३१ सी क्यू ८८१५ ची झाडाझडती केली असता दूध डेअरीच्या नावावर सुरू असलेल्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला आहे. सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनातील मागील भागात ८५ रिकामे झालेले दुधाचे प्लास्टिक ट्रे आढळून आले व सोबतच पांढऱ्या रंगाच्या १३ गोणी भरून होत्या. सदर गोणीतून शासनाने प्रतिबंध केलेल्या सुगंधित तंबाखू चा वास येत असल्याने वाहन चालकाची विचारपूस केली असता सदर गोणीत सुगंधित तंबाखू असल्याचे सांगितले. त्यावरून वाहन चालक सागर प्रकाश चौधरी, २६ रा. कोहमारा तालुका सडक अर्जुनी जि.गोंदिया हल्ली मुक्काम सदभावना नगर श्रीरामनगर नागपूर व प्रणय राजेश सावरकर ४१ रा. नंदनवन नागपूर, या दोघांना ताब्यात घेत कारवाई केली. या कारवाईत ४लाख ८६ दोनशे रुपयांचा सुगंधित तंबाखू व १० लाख रुपये किमतीचे वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची माहिती अन्न व सुरक्षा प्रशासन यवतमाळ यांना दिल्यानंतर अन्न व सुरक्षा विभागाचे अधिकारी जी पी दंदे यांनी फिर्याद नोंदविली. त्यावरून भा दं वि कलम १८८,२७२,२७३,३२८/३४ सहकलम अन्न सुरक्षा अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंद करून सदर सुगंधित तंबाखू कुठून आणला यासंबंधीचा तपास चालक,वाहकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.



सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पवन बन्सोड,अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे,ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात डीबी प्रमुख एपीआय माधव शिंदे, सहा.फौजदार सुदर्शन वानोळे,पंकज उंबरकर,विशाल गेडाम,शाम राठोड,मो.वसीम,गजानन कुळमेथे आदींनी केली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top