वणीत भव्य शंकरपटाचे आयोजन
जत्रा मैदानात भरणार विदर्भ केसरी शंकरपट
संजय खाडे मित्र मंडळाचे आयोजन
वणी:- तालूक्यातील परंपरा कायम ठेवत यावर्षी सुध्दा स्व. खासदार बाळू धानोरकर यांचे स्मृतिप्रित्यर्थ भव्य विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमीटेडचे अध्यक्ष संजय खाडे व मित्र परिवाराच्या वतिने येथील जत्रा मैदानात 20 ते 22 फेब्रूवारी दरम्यान केले आहे.Organizing grand Shankarpata in Wani
वणी शहरातील जत्रा मैदानात 20 ते 22 फेब्रूवारी या तिन दिवसात रंगनाथस्वामी अर्बन निधी चे अध्यक्ष संजय खाडे व मित्रपरिवाराने विदर्भ केसरी भव्य शंकरपटाचे आयोजन केले आहे. स्पर्धेत लाखोची बक्षिसे दिली जाणार आहेेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राहतील तर उद्घाटक महाराष्ट्र् राज्य काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, प्रमुख पाहूणे माजी मंत्री माणिकराव ठाकरे,माजी मंत्री शिवाजीराव मोघे,माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके, आमदार अॅड यशोमती ठाकूर,प्रदेश काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार एस क्यू झामा, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, आमदार वजाहत मिर्झा, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफूल मानकर, माजी आमदार विश्वास नांदेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या शंकरपटात विदर्भासह,मराठवाडा येथील बैलजोड्या सहभागी होणार आहेत. शंकरपट प्रेमींनी या तिन दिवशीय शंकरपटाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजक संजय खाडे व मित्रपरिवाराने केले आहे.

