फरार आरोपी वणी पोलिसांच्या जाळ्यात...
अल्पवयीन मुलीवरील, अत्याचाराचा आरोपी.
वणी:- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गेल्या आठ महिन्यापासून पसार झालेल्या आरोपीला वणी पोलिसांनी दुर्गापूर येथून ताब्यात घेतले आहे.Fugitive accused Wani in police net..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्त आटोपून पोलीस पथक दुर्गापूर(चंद्रपूर) च्या दिशेने रवाना झाले. गेल्या आठ महिन्यापासून फरार असलेला आरोपी आजम शेख बाबा शेख २७ वार्ड क्र. ३ याला ताब्यात घेतले. बाबा शेखवर ११ जुलै २०२३ ला अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार,तसेच अनु.जाती,जमाती कायदा व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर आठ महिन्यांनी वणी पोलिसांनी दुर्गापूर पोलिसांच्या मदतीने फरार असलेल्या आजम शेख बाबा शेख ला ताब्यात घेतले आहे.Fugitive accused Wani in police net..
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे,ठाणेदार अनिल बेहरानी,सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक झोडेकर, विजय वानखडे, शुभम सोनूले,गजानन कुळमेथे आदींनी केली आहे.