वणीच्या ठाणेदारांना चोरट्यांचे आव्हान.
शहरात पुन्हा घरफोडीचा प्रयत्न.....
घरफोडीचे सत्र सुरूच..
वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नांदेपेरा मार्गावरील सहारा पार्क येथील घरफोडीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच शहरातील साई मंदिर परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. तर शेजारीच असलेल्या भोजनालयाच्या संचालकाच्या घरी चोरी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. परिणामी नवीन ठाणेदारा समोर चोरट्यांनी जणू आव्हानच उभे केले आहे.Thieves' challenge to Thanedar of Wani.
मागील आठवड्यात नांदेपेरा मार्गावरील सहारा पार्क येथील शंकर घुगुल या शिक्षकाचे भर दुपारी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आठ फेब्रुवारी ला उघडकीस आली होती. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच रविवारी रात्रीचे सुमारास साई मंदिर परिसरात चोरट्यांनी गायत्री भोजनालय च्या संचालकाच्या घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे. इतकेच नव्हे नव्हे तर त्यांच्या घराच्या मागे असलेल्या शहरातील प्रतिष्ठित जिनिंग मालकाच्या घरात प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र जिनिंग मालकाच्या घरातील चोरीचा प्रयत्न फसला असल्याची माहिती आहे. सदर दोन्ही घटनेची वृत्तलिहिपर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.Thieves' challenge to Thanedar of Wani.