विदर्भ केसरी शंकरपटात शंभरहुन अधिक बैलजोड्यांनी उडविला धुरळा

0

विदर्भ केसरी शंकरपटात शंभरहुन अधिक बैलजोड्यांनी उडविला धुरळा.

६.५४ सेकंदात लखन-जलवा जोडीजलवा चा हंगामाने गाठले मैदान.


sangini news




वणी:- येथील जत्रा मैदानावर स्व. बाळू धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन संजय खाडे मित्र परिवाराने केले आहे. मंगळवारी या जंगी शंकरपटाचे थाटामाटात उदघाटन झाले. पहिल्या दिवशी ३० तर दुसऱ्या दिवशी ४० बैलजोड्यांनी जणू धुरळाच उडविला होता. तर गुरुवारी सुद्धा भरपूर जोड्या प्रतीक्षेत होत्या. यात सहा सेकंद ५४ पॉईंट मध्ये एका जोडीने मैदान मारले आहे. In Vidarbha Kesari Shankarpat, more than a hundred bullocks flew the dhurala.


यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जंगी विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन २० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. यात पहिल्याच दिवशी ३० बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. यात गावगाडा स्पर्धा सुद्धा घेण्यात आली होती.




प्रसंगी शेतकऱ्यांच्या लेकिनी शंकरपटात बैलजोड्या हाकल्या, प्रथम जोडी श्रुती वाळगे या १८ वर्षीय तरुणीने हाकली. आणि गावगाडा स्पर्धेत रांगणा येथील गुणवंत वांढरे या शेतकऱ्याच्या जोडीने ८.१ सेकंदात अंतर कापत प्रथम क्रमांक पटकावला, तर राजूर इजारा येथील भाविका मिलमिले, गणेशपूर येथील राधा बोबडे या तरुणींनी सहभाग नोंदविला होता. यात राधा बोबडे हिच्या जोडीने ८.३३ सेकंदात अंतर कापून पाचवे स्थान मिळविले. या शंकरपटाचे आकर्षण या तरुणी ठरल्या होत्या .In Vidarbha Kesari Shankarpat, more than a hundred bullocks flew the dhurala.




दुसऱ्या दिवशी वाशीम येथील बैलजोडीने ६.५९ सेकंदात बाजी मारली होती. बुधवारी जवळपास ४० बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. बुधवारचे आकर्षण वाशीम येथील जोडी ठरली होती. जत्रा मैदानात सुरू असलेल्या जंगी शंकरपटात हौशीची अमाप गर्दी होती. विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेशातून सुद्धा बैलगाडा शर्यत प्रेमींनी सहभाग नोंदविला आहे. गुरुवारी अंतिम शर्यती सुरू झाल्यात . यात सध्यातरी वाशीम येथील जोडीचे अंतर तोडत संभाजीनगर करोडी येथील मनोहर चव्हाण,राजू चव्हाण यांच्या लखन-जलवा जोडीने वाशीमच्या जोडीचे अंतर कापत अवघ्या ६.५४ सेकंदात मैदान मारले आहे. सध्यातरी स्पर्धा जोमात सुरू आहे. यात कोण बाजी मारणार हे स्पर्धेअंती कळणार आहे.


लखन-जलवा चा धमाका

लखन-जलवा या जोडीने व धुरकऱ्याने अनेक शंकरपटात प्रथमस्थान पटकावत बक्षिसे जिंकली आहेत. वणी येथील विदर्भ स्तरीय शंकरपटात सध्यातरी लखन-जलवा याच जोडीने धमाका केला आहे. या जोडीच्या धुरकाऱ्याला सुद्धा प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली होती. तर वाशीम येथील साहेबराव यांची जोडी सध्यातरी द्वितीय स्थानी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top