शेतकरी आक्रोश मोर्चा धडकणार तहसील कार्यालयावर.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची उपस्थिती
वणी:- केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ, उद्या वणी विधानसभा काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले संबोधित करणार असल्याचे काँग्रेसने काढलेल्या पत्रकातून कळविले आहे.Farmers protest march will strike at tehsil office.
केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाने शेतकरी,कष्टकरी, व्यावसायिक, बेरोजगार युवक, लहान व्यावसायिक तथा सामान्य माणूस पुरता भरडल्या गेला आहे. शेतमालाला भाव नाही, प्रत्येक वस्तूवर अवाजवी कर आकारणी, पडलेले पिकाचे भाव, अनाठायी आयात धोरण, अशी दडपशाही चालू आहे. परिणामी ऐनवेळी शेतमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडण्याचा कुटील डाव केंद्र सरकार साधत आहे. या केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाविरुद्ध २३ फेब्रुवारी शुक्रवारी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन वणी विधानसभा काँग्रेस कमिटीने केले आहे. शेतकरी आक्रोश मोर्चा शुक्रवारी सकाळी १२ वाजता रंगनाथ स्वामी मंदिरा जवळून ,गांधी चौक,खाती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा पायदळ सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत शांततेत निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ (शिवतीर्थावर) जाहीर सभा होणार आहे.Farmers protest march will strike at tehsil office.