बीएसएनएल ची इंटरनेट सेवा कोलमडली
ग्राहकांना होतोय नाहक त्रास.
दर रविवारी इंटरनेट होतेय खंडित.
वणी:- भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड कंपनीची सेवा गेल्या कित्येक महिन्यापासून लपंडाव खेळत आहे. वारंवार खंडित होत असलेल्या बीएसएनएल च्या सेवेने ग्राहक पुरते वैतागले आहे. इंटरनेट सेवा,संपर्क सेवा पूर्ववत करण्याची मागणी ग्राहक करीत आहेत. मात्र येथील अधिकारी खाजगी कंपन्यांच्या तालमीत तर नाही ना? असे आरोप होते आहे.Internet service of BSNL collapsed
संपर्क क्षेत्राच्या बाहेर.
शहरात असून देखील आपण डायल केलेला क्रमांक संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. अशी ध्वनिफीत ऐकायला येते. धड फोन लागत नाही मधातच फोन कापला जातो. धड बोलणेही दुरापास्त झाले आहे. बीएसएनएल ची सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. स्पर्धेत असलेल्या कंपन्यांचे नेटवर्क खूप चालत आहे. तर बीएसएनएल चे नेटवर्क ढेपाळले आहे. मग शासनाने दिलेले अधिकारी खाजगी कंपन्यांशी साटेलोटे करीत आहेत की,काय?असा प्रश्न निर्माण होतं आहे. एकूणच बीएसएनएल ने ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी सेवा नियमितपणे देण्याची गरज आहे.Internet service of BSNL collapsed
बीएसएनएल ची ब्रॉडबँड सेवा पूर्वी खूपच छान होती. मात्र इतर कंपन्यांनी स्पर्धा करीत सुरुवातीला ग्राहकांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली होती. परिणामी बीएसएनएल चे बहुतांश ग्राहक तिकडे परावर्तित झाले होते. सध्यातरी बीएसएनएल ची सेवा पुरती ढेपळली आहे. परिणामी पूर्वीपासून ग्राहक असलेले मात्र आता हतबल झाले आहे.
बीएसएनएल चा नेहमीच कारभार विस्कळीत होतो आहे. इंटरनेट सेवा कोलमडली आहे. पूर्वीपासून बीएसएनएल ची सेवा घेणारे ग्राहक पुरते त्रस्त झाले आहे. यात खाजगी कंपनीला मोठे करण्यासाठी येथील अधिकाऱ्यांचे षडयंत्र असल्याचे आरोप सामान्य ग्राहक करीत आहे. काही वेळासाठी लगेच नेटवर्क येतंय व गायब होतय! परिणामी ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. कित्येक प्रतिष्ठानात वस्तू खरेदी केल्यानंतर अपमानित व्हावे लागल्याचे अनेक ग्राहक बोलत आहे. सर्वात चांगली सेवा देणारी ही कंपनी आता खाजगी कंपन्यांची मांडलिक झाल्याचे ग्राहक आरोप करीत आहे. एकूणच वणी शहरात व इतर भागातही बीएसएनएल ची सेवा ढेपळल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे. शनिवार ,रविवार या दिवशी तर पुरती सेवा विस्कळीत होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.Internet service of BSNL collapsed
बीएसएनएल मोजतेय अखेरच्या घटका?
सर्वात जास्त इंटरनेटची स्पीड असलेले बीएसएनएल आता अखेरच्या घटका मोजत आहे. मग नवनवीन फिचर येत असल्याचे ग्राहकांना सांगण्यात येत आहे. पण इथे नेटवर्क नाहीच तर नवीन फिचर चा उपयोग काय? असा सवाल उपस्थित होते आहे.