विदर्भ-मराठवाड्यात वादळी पावसासह गारपीटीची शक्यता Vidarbha-Marathwada likely to experience thunderstorm with hail

0

विदर्भ-मराठवाड्यात वादळी पावसासह गारपीटीची शक्यता.

हवामान खात्याने वर्तविला अंदाज.

शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या पिकाचे नियोजन करण्याची गरज


sangini news



वणी:- विदर्भ-मराठवाड्यातील १३ जिल्ह्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या शेतमालाचे व्यवस्थित नियोजन करण्याचा इशारा दिला आहे.Vidarbha-Marathwada likely to experience thunderstorm with hail.

२५ फेब्रुवारी ला मराठवाड्यातील हिंगोली,नांदेड तर विदर्भातील अकोला,अमरावती,बुलढाणा,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट आहे. उद्या २६ फेब्रुवारी ला परभणी,हिंगोली,नांदेड,अकोला,अमरावती, ,बुलढाणा,भंडारा,गोंदिया,नागपूर,चंद्रपूर,वर्धा,चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. २७ फेब्रुवारी ला मराठवाड्यातील हिंगोली व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच २९ फेब्रुवारी पर्यत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २५ ते २७ फेब्रुवारी पर्यत वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भ-मराठवाड्यातील १३ जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात नागपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यात तीव्रता अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या पिकाचे योग्य नियोजन करावे असा इशाराही देण्यात आला आहे.



विदर्भ-मराठवाडा वगळता इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top