गणेशपूरात छत्रपती महोत्सवानिमित्य विविध कार्यक्रम.
वणी : छत्रपती महोत्सव समिती, गणेशपूर द्वारा भव्य छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा छत्रपती स्मारक परिसर, ग्रामपंचायत पटांगण, गणेशपूर येथे आयोजित करण्यात आला. दूरदर्शन, झी मराठी कलाकार नागपूर येथील तुषार सूर्यवंशी यांचे तुफान विनोदी प्रबोधनात्मक कार्यक्रम दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती महोत्सव समिती, गणेशपूर द्वारा छत्रपती शिवाजी ममहाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त दि.१७ ते १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतं आहे. दि. १७ फेब्रुवारी ला सायंकाळी साडेसहा वाजता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजरी वादक, राष्ट्रीय प्रबोधनकार, दूरदर्शन, झी मराठी कलाकार नागपूर येथील तुषार सूर्यवंशी यांचे तुफान विनोदी प्रबोधनात्मक कार्यक्रम,
तरी संपूर्ण गणेशपूर ग्रामवासी तथा आपल्या वणी परिसरातील सर्वांनी या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती महोत्सव समिती, गणेशपूर कडून करण्यात येत आहे
दि.१८ फेब्रुवारी ला सायंकाळी साडेसहा वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि १९ फेब्रुवारी ला सायंकाळी सात वाजता भव्य माल्यार्पण सोहळा, महाप्रसाद कार्यक्रम व बक्षीस वितरण सोहळा आयोजित केलेला आहे.