रुकमाई कोल वॉशरीजच्या कामगारांचे कामबंद आंदोलन.
कामगार वेतन कायद्यानुसार वेतनाची मागणी.
आंदोलनाकडे सर्वांचेच दुर्लक्ष.
वणी:- यवतमाळ मार्गावरील टेकवर्थ सोल्युशन प्रा.लिमिटेडच्या (रुकमाई कोल वॉशरीज) मधील कामगारांना इतर कोल वॉशरीज च्या तुलनेत अत्यल्प वेतन मिळत असल्याने जवळपास शंभरहून अधिक कामगारांनी वेतन वाढवून मिळण्यासाठी १६ फेब्रुवारी पासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र कंपनीने वेतन वाढवून देऊ शकत नसल्याचे कामगारांना पत्राद्वारे कळविले आहे.Strike by workers of Rukmai Coal Washies.
वणी तालुक्यातील निंबाळा येथे टेकवर्थ सोल्युशन ची रुकमाई कोल वॉशरीज आहे. तेथे शेकडो कामगार कार्यरत आहे. सदर कामगारांना पिंपळगाव,घुग्गुस येथील कोल वॉशरीजच्या तुलनेत अत्यल्प वेतन दिल्या जात आहे. गुप्ता कोल वॉशरीज घुग्घुस ,पिंपळगाव येथील कामगारांना १५ हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. व रुकमाई मधील कामगारांना कमी वेतन देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात कामगारांनी ६ फेब्रुवारीला मागण्यांचे निवेदन रुकमाई कोल वॉशरीज प्रशासनाला दिले होते. त्यानुसार कोल वॉशरीजने तीनशे ९४ रुपयांची वेतनवाढ केल्याचे त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे. मात्र तीनशे ९४ रुपये हे अगदी कमी असल्याने कामगारांनी रुकमाई कोल वॉशरीज समोरच कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आता कामगारांना न्याय मिळणार की आंदोलन दडपून टाकणार हे बघणे महत्वाचे आहे. Strike by workers of Rukmai Coal Washies.
आंदोलनाची दखल घ्यावी
रुकमाई कोल वॉशरीजच्या कामगारांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले असतांना प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. केवळ पोलीस प्रशासनाने भेट दिली खरी पण त्यावर तोडगा काढण्यासाठी कोणीही आले नसल्याचे कामगारांनी सांगितले. या मागणीची दखल घेण्याची विनंती कामगारांनी केली आहे.
राजकीय पुढारी गप्पच..
मागील काळात कोल वॉशरीजच्या कामगारांच्या आंदोलनात राजकीय पुढारी आवर्जून उपस्थित राहत होते. त्यात स्टंटबाजी,करून चिरीमिरीत दंग असायचे. कामगारांच्या साधेपणाचा फायदा पुढाऱ्यांना चांगलाच झाला होता. मग आता त्यांच्या संघटना आहेत. तरीसुद्धा पुढारी गप्पच आहे. केवळ हे पुढारी हितसंबंध तर जोपासत नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.