संजय देरकर शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाचे विधानसभा प्रमुख.
वणी:- वणी विधानसभा मतदारसंघात स्वतःचे वलय असलेले नेते संजय देरकर यांची शिवसेना(उ.बा.ठा)पक्षाच्या विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Sanjay Derkar Assembly Chief of Shiv Sena (U.B.T.) Party.
वणी विधानसभा क्षेत्रात मितभाषी म्हणून ओळख असलेल्या संजय देरकर यांचे खूप मोठे वलय आहे. मागील काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवीत मताधिक्य मिळविले होते. तळागाळात जाऊन जनतेच्या मनात जागा करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मितभाषी स्वभावामुळे तळागाळातील लोकांशी सलोख्याचे संबंध त्यांनी जोपासले आहे. सहकार क्षेत्रात असलेली पकड, सर्वसामान्य जनतेत मिळविलेले स्थान हीच त्यांची जमेची बाजू आहे. मागील काही काळात त्यांनी महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना(उ.बा.ठा) पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने २७ फेब्रुवारी ला वणी विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. वणी विधानसभा मतदारसंघात संजय देरकर यांच्या नियुक्तीने पक्षाला अधिकच बळ मिळणार आहे. आगामी काळात वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना(उ.बा.ठा.) पक्ष जोमाने वाढण्याची चिन्हे दिसत आहे.
Sanjay Derkar Assembly Chief of Shiv Sena (U.B.T.) Party.
पक्ष संघटन मजबूत करणार.
शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाने वणी विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. पक्ष संघटन मजबूत करून पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करीत केलेल्या नियुक्तीला न्याय देण्याची भूमिका पार पाडणार असल्याचे संजय देरकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.
एकनिष्ठ शिवसैनिकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
२८ फेब्रुवारी