ब्रेकिंग एका पाठोपाठ अपघाताच्या दोन घटना Braking Two occurrences of accidents one after the other

0

 ब्रेकिंग:- एका पाठोपाठ अपघाताच्या दोन घटना.

ट्रकखाली चिरडून युवक जागीच ठार. एक गंभीर.

वरोरा मार्गावरील संविधान चौकातील घटना.

दुसऱ्या अपघातातील दुचाकीचा चुराडा




sangini news


Braking:- Two occurrences of accidents one after the other.



वणी:- वरोरा मार्गावर असलेल्या संविधान चौकात ट्रकने युवकाला चिरडले. यात युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तर जवळच एकाला ट्रकने धडक दिली यात दुचाकीस्वाराने उडी मारली परिणामी तो थोडक्यात बचावला. यात दुचाकीचा पूर्ण चुराडा झाला आहे. तूर्तास अपघातातील दोन ट्रक व दोन्ही दुचाकी पोलिसांनी ठाण्यात नेल्या होत्या. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. एकाचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला तर गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

  



वणी-वरोरा मार्गावरील संविधान चौक परिसरात एकाच वेळी दोन अपघात बुधवारी दुपारी एक वाजताचे सुमारास घडले आहे. एम एच ३४ ए क्यू ९०४७ या दुचाकीने वरोरा येथील राहुल सुभाष बोरा(४०) हा दिलीप खेमसिंग अंदवानी रा. खन्नारी जि.बालाघाट एम पी. या युवकाला सामान खरेदीसाठी वणीत घेऊन आला होता. सामान घेऊन परतत असतांना मागून येणाऱ्या एम एच ३४ ए बी ६२३२ या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात मागे बसलेला दिलीप अंदवानी हा मध्य प्रदेशातील कामगार युवक जागीच ठार झाला तर राहुल बोरा हा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजताचे सुमारास घडली आहे.Braking:- Two occurrences of accidents one after the other.

तर त्या पाठोपाठ एम एच २९ ए सी २६२३ या दुचाकीने येणाऱ्या कोना येथील गणेश उपरे २२) च्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच३४ बी जी २०८२ ने धडक दिली. यात गणेशने उडी मारली परिणामी तो थोडक्यात बचावला मात्र त्याच्या दुचाकीचा पुरता चुराडा झाला आहे. दोन्ही ट्रक आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. घटनास्थळी जमादार विकास धडसे,वसीम,चालक मडकाम आले होते. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता.




पोलिसांनी नातेवाईकांना सदर घटनेची माहिती दिली आहे.

युवासेनेच्या तरुणांनी केली मदत.

अपघात झाल्याची माहिती युवासेनेचे अजिंक्य शेंडे याला मिळताच त्याने धीरज भोयर,रोशन काकडे,चेतन उलमाले यांना घेऊन घटनास्थळ गाठले. आणि वाहतूक विभाग,रुग्णवाहिकेला फोन करून जखमीला नांदेपेरा मार्गावरील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top