प्रजासत्ताक दिनी मारोती किनाके चा सन्मान.
गेल्या १८ वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयात देत आहे सेवा.
Honoring Maroti Kinake on Republic Day..
वणी:- येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या १८ वर्षापासून कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या मारोती किनाके चा प्रजासत्ताकदिनी येथील शासकीय मैदानावर झालेल्या कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
वणी ग्रामीण रुग्णालयात २००६ पासून ड्रेसर, तसेच शवविच्छेदन, व इतर कामे करणारा मारोती सुगन किनाके रुग्णांना अविरत सेवा देत आहे. अगदी सामान्य सुस्वभावी मारोती कोणताही मृतदेह असेल तर न चुकता त्याचे शवविच्छेदन करून प्रशासनाला मदतच करतो आहे. कोणत्याही प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे असते. यात कसलीही तमा न बाळगता मारोती रुग्णालयात काम करत असतो. मग अपघात असो किंवा विष प्राशन केलेले रुग्ण त्यांचा प्रथमोपचार करण्यासाठी मारोती पुढे असतो. कोणत्याही ऑपरेशन मध्ये डॉक्टरांच्या मदतीला तो नेहमीच असतो. त्याची गेल्या १८ वर्षापासूनच्या सेवेची दखल घेत प्रशासनाने २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी वणी येथील शासकीय मैदानात झालेल्या कार्यक्रमात, उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आमदार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मारोती किनाके चा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.

