शेतकरी कामगार नेते कॉम्रेड शंकरराव दानव यांचे निधन.
वणी : यवतमाळ जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव ह्यांना दि. २७ ला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रसंगी उपचारादरम्यान ३१जानेवारीला त्यांचे निधन झाले आहे.Farmer labor leader Comrade Shankarao Danav passed away..
कॉम्रेड शंकरराव दानव ह्यांची संपूर्ण हयात शेतकरी,शेतमजूर, कामगार, दलीत, आदिवासी, महिला, विद्यार्थी व युवक ह्यांचा हक्कासाठी संघर्ष करण्यात गेली. वयाचा १५ व्या वर्षापासून स्वतःला चळवळीत झोकून दिले होते. त्यांनी चालविलेल्या संघर्षातून अनेकांना चांगले जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात वन जमीन हक्क आंदोलन चालवून हजारो शेतकऱ्यांना हक्काची जमीन मिळवून दिली आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून दिला होता. विविध क्षेत्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्षात राहिल्याने जिल्ह्यात त्यांना मोठा बहुमान होता. गेल्या ६० वर्षापासून चळवळीत राहिल्याने त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले तसेच त्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार सुद्धा करण्यात आले होते.Farmer labor leader Comrade Shankarao Danav passed away..
कॉम्रेड शंकरराव दानव ह्यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस करीत लवकर बरे होण्याची कामना व्यक्त केली होती. अशा या लोकनेत्याची चंद्रपूर येथील रुग्णालयात ३१ जानेवारीला प्राणज्योत मालवली. कॉ. दानव यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

