सहारा पार्कमध्ये भरदिवसा घरफोडी....
पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास...
नुकत्याच रुजू झालेल्या ठाणेदाराला चोरट्यांची सलामी.
वणी:- / शहरालगत असलेल्या नांदेपेरा मार्गावरील सहारा पार्क मधील कुलूपबंद घराचे कुलूप तोडून चोरट्यानी दोन लाख ७३हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ८ फेब्रुवारी(गुरुवारी) दुपारी पावणे दोन वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे. यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी गेल्याची तक्रार संबंधितांनी दिल्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यातच नव्या ठाणेदारांनी पदभार स्वीकारला असतांना चोरट्यानी जणू त्यांना सलामीच दिली आहे.Broad daylight burglary in Sahara Park.
नांदेपेरा मार्गावरील सहारा पार्क येथे शंकर किसन घुगुल हे खाजगी शाळेत शिक्षक आहेत तर पत्नी रुग्णालयात परिचारिका आहेत. सदर शिक्षक गुरुवारी सकाळी शाळेत गेले तर पत्नी सकाळी सव्वा दहा वाजताचे सुमारास घराला कुलूप लावून कामावर गेली होती. दुपारचे सुमारास शेजाऱ्यांना घुगुल यांच्या घराचे कुलूप तोडून दिसले. त्यांनी सदर घटनेची माहिती घुगुल यांच्या पत्नीला फोन करून दिली. त्यानंतर घुगुल व त्यांची पत्नी घरी आले तेव्हा बाहेरील दाराचे कुलूप कुंडीने तोडून दिसले. व समोरच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात असलेल्या कपाटात ठेवलेली चार तोळे वजनाची सोन्याची पोत, कानातील डुल, व पाच हजार रुपये रोख असा एकूण एक लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला असल्याचे दिसताच घुगुल यांनी पोलीस ठाणे गाठून सदर घटनेची तक्रार नोंदवली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी भा.दं वि कलम ३८०/४५४ नुसार गुन्हा नोंद केला आहे.

