वणी:- वणी-वरोरा मार्गावरील रेल्वेचे फाटक डागडुजी करण्यासाठी १२, १३, व १४ फेब्रुवारी ला रात्री ते पहाटे च्या सुमारास बंद असणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने संबंधित विभागाला दिली आहे.
वणी:- वरोरा मार्गावरील माजरीकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या डागडुजी चे काम असल्याने दिनांक १२ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते १३ फेब्रुवारीच्या सकाळी सहा वाजेपर्यंत, आणि दिनांक १३ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते १४ फेब्रुवारीच्या सकाळी सहा वाजेपर्यंत रेल्वे फाटक बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने संबंधित विभागांना दिली आहे. सदर मार्गावरील वाहतूक वेगळ्या मार्गाने वळविण्याचे कळविले आहे. या दोन दिवसात रात्रीचे सुमारास वणी-वरोरा मार्गावरील वाहतूक बंद असणार असून पर्यायी मार्गाने ती वळविण्यात येणार असल्याचे नमूद आहे..

