मोठ्या वडिलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला
पुतण्या अटकेत
वणी : मुकुटंबन पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या मच्छीमार सोसायटी परिसरात जागेच्या वादावरून पुतण्याने मोठ्या वडिलांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळचे सुमारास घडली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी पुतण्याला अटक केली आहे. An ax attack on elder father
मुकुटंबन येथील मच्छीमार सोसायटी जवळ नागोराव तोकलवार हे कुटुंबासह राहतात. व त्यांचा भाऊ राजू तोकलवार हा शेजारीच राहतो. दोन्ही सख्या भावांच्या कुटुंबात जागेवरून वाद होता. छोट्या मोठ्या कारणाने दोन्ही कुटुंबात नेहमीच खटके उडत होते. कडाक्याचे भांडण सुद्धा होत होते.
१५ मार्च शुक्रवारी सायंकाळी साडेसहा चे सुमारास नागोराव,त्यांची पत्नी,मुली स्वतःच्या घरी एकमेकांशी गप्पा करीत असताना अचानक पुतण्या तरुण राजू तोकलवार तिथे आला आणि माझ्या आईशी थुंकल्याच्या कारणावरून भांडण का केले असे विचारत भांडण करू लागला. शेवटी भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. भांडण सोडविण्यासाठी बसलेले सर्व गेले.,परंतु भर रस्त्यात तरुण नागोराव ला मारहाण करीत होता. लागलीच तरुण ने घरात जाऊन कुऱ्हाड आणली व नागोराव च्या डोक्यावर त्याने कुऱ्हाडीने वार केलेत. या हल्ल्यात नागोराव रक्तबंबाळ झाला. तरीसुद्धा तरुण नागोराव ला जीवे मारण्याच्या धमक्या देतच होता.