ट्रॅक्टर चालकाची गळफास लावून आत्महत्या.
Tractor driver committed suicide by hanging himself.
वणी-: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहदा (वेळाबाई) येथील ४२ वर्षीय ट्रॅक्टर चालकाने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १५ मार्च शुक्रवारी रात्रीं नऊ वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.
तालुक्यात गेल्या १५ दिवसात आत्महत्येच्या जवळपास १५ ते वीस घटना घडल्या आहेत. यात तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्तच आहे. एकापाठोपाठ एक अश्या आत्महत्येच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. यातच शुक्रवारी रात्री नऊ वाजताचे सुमारास मोहदा(वेळाबाई)येथील आदुराम सुंदरलाल किलो हा ट्रॅक्टर चे काम आटोपून घरी आला. आणि काही वेळाने त्याने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रात्रीच उघडकीस आली आहे. आदुराम हा मूळ ओरिसा चा असल्याची माहिती आहे.Tractor driver committed suicide by hanging himself.
या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व आदुराम चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता. ट्रॅक्टर चालक असलेल्या आदुराम ने आत्महत्या का केली हे अद्यापही अनुत्तरित आहे. त्याच्या मागे पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.