शिरपूर पोलीस ठाण्यात नवीन ठाणेदार रुजू.
वणी:- पोलीस उपविभागातील शिरपूर पोलीस ठाण्यात नुकतेच नवीन ठाणेदार रुजू झाले आहेत. याआधी ते वणी येथे सहायक पोलीस निरीक्षक(डीबी पथक प्रमुख) पदी कार्यरत होते.New Thanedar joins Shirpur Police Station.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बहुतांश पोलीस निरीक्षक,सहायक पोलिस निरीक्षक, व इतर अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. परिणामी वणी उपविभागातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराची बदली झाली होती. ती जागा रिक्त असल्याने शिरपूर पोलीस ठाण्यात वणी येथे कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. नुकताच सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे.
वणी येथे माधव शिंदे यांनी उत्तमरीत्या कार्य केले आहे. परिणामी त्यांच्याकडे डीबी प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती. मागील काळातील ठाणेदार गजानन करेवाड यांनी शिरपूर परिसरात चांगलाच वचक निर्माण केला होता. त्याच धर्तीवर नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार माधव शिंदे हे देखील दबदबा निर्माण करू शकतात अशी त्यांची ख्याती आहे. आता शिंदेनी पदभार स्वीकारल्यावर जुन्या सोंगट्या पुढे पुढे करीत फिल्डिंग लावण्यात यशस्वी होणार की, नवा गडी नवा राज असणार ही येणारी वेळच ठरविणार आहे.New Thanedar joins Shirpur Police Station.