आमदार प्रतिभा धानोरकरांची उमेदवारी अद्यापही अस्पष्टच
जागा वाटपाचा तिढा सुटेना
विरोधकांना मैदान मोकळं करण्याची खेळी तर नसेल ना?
जनमानसात चर्चेला उधाण
वणी :- (Sangini News)
चंद्रपूर-वणी-आर्णी Chandrpur-Wani- Arni लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिवंगत खासदार स्व. बाळू धानोरकर Balu Dhanorkar यांच्या अर्धांगिनी आ. प्रतिभा धानोरकर MLA Pratibha Dhanorkar यांनी मागितली आहे. आणि मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात देखील केली होती. मात्र ऐनवेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay wadettiwar यांच्या कन्येने दावा केला होता. त्यानंतर दिल्लीत खलबत सुरू झाले. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर होत असताना चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाचा उमेदवार पक्षाने जाहीर न केल्याने आ प्रतिभा धानोरकर MLA Pratibha Dhanorkar यांची काँग्रेस पक्षाची उमेदवारी अद्याप अस्पष्टच आहे. परिणामी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते विरोधकांना मैदान मोकळे करून देण्याची खेळी तर खेळत नसेल ना? अश्या चर्चेला जनमानसात चांगलेच उधाण आले आहे. देशातील घडामोडी बघता अत्यंत महत्वाची जागा असलेली चंद्रपूर Chandrapur लोकसभेची उमेदवारी धानोरकरांना न दिल्यास ही जागा स्वतःहून विरोधकांच्या घशात जाणार असे मत जाणकार व्यक्त करतांना दिसते आहे.
-min.jpg)
मागील काळात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर. Balu Dhanorkar यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर Hansaraj Ahir यांचा पराभव करीत निवडणूक जिंकली होती. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे Congress Party स्व. बाळू धानोरकर हे एकमेव खासदार होते. यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक सुद्धा घेण्यात आली नाही. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ लोकप्रतिनिधी विनाच पोरका राहिला.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर Late MP Balu Dhanorkar यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर MLA Pratibha Dhanorkar या वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यात. दिवंगत बाळू धानोरकरांचे अर्धवट राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. गावागावात जाऊन प्रत्यक्ष भेटी घेतल्या परिणामी दिवंगत खासदारांची उणीव भासू दिली नाही.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि आ प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मिळविण्यासाठी दावेदारी केली. मतदारसंघात त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती पुन्हा जागृत झाली. यावेळी प्रतिभा धानोरकर MLA Pratibha Dhanorkar यांनाच निवडून देण्याचे वारे ही वाहू लागले होते. तिकीट मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठी कडे त्यांनी प्रयत्न देखील केले. आणि अद्यापही प्रयत्न सुरूच आहेत.
ऐनवेळी झाली स्पर्धेला सुरुवात
लोकसभा निवडणुकीच्या काळात आ प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी पक्षाकडे उमेदवारी मागताच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition Vijay Wadettiwar) यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनीही ऐनवेळी पक्षाकडे उमेदवारी मागितली. काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावर उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली अन येथेच खरी स्पर्धेला सुरुवात झाली. एकीकडे दिवंगत खासदारांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition Vijay Wadettiwar) यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांच्यात तिकिट मिळविण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती.
भैय्या ऐवजी भाऊ
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजपाने माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर (Hansaraj Ahir) यांची उमेदवारी कापत महाराष्ट्र सरकार चे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार Forest Minister Sudhir Mungantiwar यांना उमेदवारी जाहीर केली. मागील काळात दिवंगत खासदार बाळू धानोरकर विरुद्ध केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यात काट्याची लढत झाली होती. हे विशेष!
विविध चर्चांना उधाणभाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Sudhir Mungantiwar) यांची उमेदवारी जाहीर करताच काँग्रेस मध्ये उमेदवारी साठी स्पर्धेला सुरुवात झाली. परवा पर्यंत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition Vijay Wadettiwar) यांची कन्या शिवानी वडेट्टीवार Shivani Wadettiwar यांचे नाव चर्चेत असतांना अचानक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकीकडे जनाधार घेत आ. प्रतिभा धानोरकर उमेदवारी मिळविण्यासाठी एकाकी लढा देत असतांना अचानक विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची दावेदारी पुढे आल्याने जनमानसात विविध चर्चेला उधाण आले आहे. परिणामी दिवंगत खासदार बाळू धानोरकर Late MP Balu Dhanorkar यांची पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी सध्यातरी अस्पष्टच असल्याचे दिसते आहे.
विरोधकांना मैदान मोकळे करून देण्याची खेळी?
एकीकडे आ प्रतिभा धानोरकर यांचे नाव चंद्रपूर लोकसभा उमेदवार म्हणून पुढे असतांनाच अचानक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव पुढे आल्याने काँग्रेस पक्षाने अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. एकीकडे भाजपचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार Forest Minister Sudhir Mungantiwar यांनी कार्यकर्ता मेळावा,भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केले नसल्याने, विरोधकांना मैदान मोकळे करून देण्याची ही खेळी तर नसेल ना? अशी चर्चा जनमानसात चांगलीच रंगत आहे. काँग्रेसने चंद्रपूर-वणी-आर्णी (Chandrapur,Arni,Wani) लोकसभेची उमेदवारी आ प्रतिभा धानोरकर यांना दिल्यास त्या येथे सहज जिंकू शकतात असा कौल मतदारांकडून ऐकायला मिळत आहे. अन्यथा ही जागा भाजपला जाण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसत आहे.
जागा वाटपाचा तिढा सुटेना
एकीकडे सत्ताधारी भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. मात्र महाविकास M.V.A. आघाडीच्या जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. यात नेहमीप्रमाणे चंद्रपूर जागेचा तिढा सोडविण्यास काँग्रेस Congress पक्षासाठी आव्हानच आहे. चंद्रपूर जागेची उमेदवारी आ प्रतिभा धानोरकरांचा (MLA Pratibha Dhanorkar) हक्क असल्याने त्यांनाच देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.