.
वणी:- (Sangini News)
तालुक्यातील नांदेपेरा येथील मंगेश प्रभाकर डोंगे ३३ या तरुणाचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. शहरात अनेक मित्रमंडळी होती. १९ मार्च मंगळवारी तो रात्री वणीत आल्याची माहिती आहे. बुधवार ला सकाळी मंगेश चा मृतदेह भालर मार्गावर असलेल्या एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. Suicide of a married youth by consuming poison
घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा करून मंगेश चा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला आहे.
शेतकरी कुटुंबातील मंगेश
नांदेपेरा येथील प्रभाकर डोंगे या सधन शेतकऱ्याचा मंगेश हा लहान मुलगा होता. मागील वर्षी मंगेशचा विवाह झाला होता. सधन कुटुंबातील असल्याने त्याचेवर अशी टोकाची भूमिका घेण्याची वेळ का आली? असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
ग्रामीण रुग्णालयात लोकांची गर्दी
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मंगेश चा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

