उप तालुका प्रमुखाचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
संजय देरकरांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश.
वणी:- (Sangini News)
Wani Yavatmal
वणी तालुक्यातील शिवसेना (शिंदे) गटाच्या उप तालुका प्रमुखाने शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात सहकाऱ्यांसह प्रवेश घेतला आहे. परिणामी शिवसेना शिंदे गटात गेलेल्या शिवसैनिकांची घरवापसी होतांना दिसत आहे.
Shivsena Uddhav Balasaheb Thakrey
वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शिंदे गटात गेलेल्या अनेक शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात शुक्रवारी संजय देरकर यांचे निवासस्थानी, वणी विधानसभा संपर्क प्रमुख संतोष माहुरे, माजी उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला आहे. यात शिवसेना शिंदे गटाचे उप तालुका प्रमुख शिरीष अवताडे नांदेपेरा, लाठी लालगुडा सर्कलचे भुरकी येथील उपसरपंच तथा शाखा प्रमुख विनोद दानव, शाखाप्रमुख सुमित कुंमरे, रामा गाडगे, मनोहर कनाके, विलास वाढई, विनायक पिंपळकर, रांगणा येथील तुळीशराम सातपुते, कैलास सालुरकर, कोंडू काळे, गोविंदा कुंमरे, नांदेपेरा येथील अजय भोसले शाखाप्रमुख, विजय राजूरकर उपशाखाप्रमुख, नांदेपेरा 2 मधील संतोष दूमोरे ,पवन पेचे, अंकुश ताराचंद,व असंख्य शिवसैनिकांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

