अखेर चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटला
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या उमेदवारीचा अखेर तिढा सोडवत काँग्रेस पक्षाने दिवंगत खासदार बाळू धानोरकर Late MP Balu Dhanorkar यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर MLA Pratibha Dhanorkar यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परिणामी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणूक आता चांगलीच रंगणार आहे.
लोकसभेची निवडणूक जाहीर होताच भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. सोबतच इंडिया india आघाडीने सुद्धा काही जागेची उमेदवार जाहीर केले होते. यात महाविकास आघाडीच्या काही जागांवर एकमत होत नसल्याने उमेदवार जाहीर केले नव्हते. तर महायुतीने उमेदवार यादी जाहीर करून उमेदवार प्रचाराला सुद्धा लागल्याचे बघायला मिळाले. मात्र चंद्रपूर-वणी-आर्णी Chandrapur लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षात दोन प्रबळ दावेदारांनी दावा केल्याने तिढा वाढला होता. यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार Shivani Wadettiwar या स्पर्धेत होत्या तर दुसरीकडे दिवंगत खासदार बाळू धानोरकर Late MP Balu Dhanorkar यांची पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर MLA Pratibha Dhanorkar कंबर कसून तयार होत्या परिणामी पक्षश्रेष्ठी पुढे एक आव्हानच होते. प्रबळ दावेदार असलेल्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना असलेली जनतेची सहानुभूती व त्यांच्या प्रयत्नाने अखेर चंद्रपूर Chandrapur लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना देण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

.jpeg)