-->

युवासेनेत अनेक युवकांचा पक्ष प्रवेश Many youths joined the party in Yuva Sena

0


युवासेनेत अनेक युवकांचा पक्ष प्रवेश.


वणी:- विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण,शहर भागातील युवकांना एकत्रित करीत युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी अनेक युवकांचा पक्षप्रवेश शिवसेना विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या उपस्थितीत देरकर यांच्या निवासस्थानी केला आहे. परिणामी निष्ठावंत शिवसैनिकात उत्साह वाढला आहे.Many youths joined the party in Yuva Sena.
Sangini News


शिवसेना प्रणित युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी युवकांची बैठक घेत शिवसेना पक्षांला मजबूत करण्यासाठी, युवकांना प्रेरित करून त्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रवृत्त करून शहरात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम वणी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संजय देरकर व अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली संजय देरकर यांचे निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.
वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांचा पक्ष प्रवेश शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी जुन्या सर्व निष्ठावंत शिवसैनिक यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनात पुन्हा एकदा पक्षाला बळकट करून मोठी ताकत उभी करू असे सांगत सर्व युवकांचे पक्षात स्वागत केले. प्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी युवापिढी ही पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित झाली असून हजारो युवक पक्षात प्रवेश करणार असल्याचे यावेळी सांगितले. सुधिर ठेंगणे, रवि बोढेकर आदींच्या उपस्थितीत युवकांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
 वणी शहर व परिसरातील आकाश पेंदोर, मयूर निब्रड,वसीम शेख, प्रकाश कांबळे, अशपाक शेख, तौसिफ खान,अक्षय पथाडे, तौसिफ शेख, विजय पेंदोर, विफेश साळुंके,उमेश नरपांडे, आकाश मदाकलवार, आदींसह मोठ्या प्रमाणात जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देत युवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.


प्रसंगी शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाचे गौतम सुराणा,जगन जुनगरी, विनोद ढुमणे, संतोष राजूरकर, हरी कार्लेकर, शिवराज ढुमणे,चेतन उलमाले, ऋषी काकडे, प्रशांत बल्की आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top