-->

एकाच मार्गावर दोन अपघात. एक महिला ठार तर तीन जण गंभीर जखमी

0


एकाच मार्गावर दोन अपघात. एक महिला ठार तर तिन जण गंभीर जखमी


दुचाकीस्वाराचा पाय तुटला


वणी:- (संगिनी न्यूज) वणी-यवतमाळ मार्गावरील रेल्वे फाटका जवळ दुचाकीस्वाराच्या पायावरून ट्रक गेल्याने ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा पाय तुटला असल्याची घटना सोमवार १८ मार्च ला सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास घडली आहे. तर पळसोनी फाट्याजवळ आटो ला दुचाकीची धडक बसल्याने एक महिला ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Two accidents on the same route. One woman was killed and three were seriously injured

Sangini News




भांदेवाडा येथील रुपेश माटे हा तरुण वणीहून गावाकडे जात असताना रेल्वे फाटका जवळ असलेल्या निंबाच्या झाडाखाली थांबून दुचाकी सुरू करीत होता. दुचाकी सुरू करीत असताना त्याचा पाय घसरला आणि रुपेश खाली पडला. तितक्यात मुकुटंबन कडून येणारा ट्रक त्याच्या पायावरून गेल्याने रुपेशच्या पायाचे हाड तुटले. ट्रक पायावरून गेल्याने अनर्थ टळला. रुपेश या अपघातातून थोडक्यात बचावला खरा मात्र सध्यातरी तो गंभीर जखमी आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.


तर दुसरीकडे पळसोनी फाट्याजवळ आटो ला दुचाकीची धडक बसल्याने आटोत बसलेली गंगा संजय किनाके 40 या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अरुण श्रीधर कुळसंगे राजूर हा गंभीर जखमी झाला आहे. तर दुचाकीस्वार दिनेश कवडू येटे पळसोनी हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. तूर्तास वणी पोलीस ठाण्यातील जमादार विकास धडसे आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.


एकाच वेळी दोन ठिकाणी अपघात होऊन एक महिला ठार तर तिघे गंभीर झाल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top