वणी परिसरात एकापाठोपाठ एक आत्महत्या.
आत्महत्येचे सत्र सुरूच.
वणी(रवी ढुमणे):- तालुक्यात एकापाठोपाठ एक अशा आत्महत्या करण्याचे प्रयत्न होत आहे. शनिवारी दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.यात एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर होती. यातच रविवारी तलावाजवळ एक मृतदेह आढळून आला आहे. सदर तरुणाची आत्महत्या असल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहेOne suicide after another in Vani area.
.
तालुक्यातील आबई येथील मारोती प्रभाकर बलकी (३२) याने शनिवारी सकाळी शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले.सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी शेतात जाऊन बघितले असता मारोती चा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले व पंचनामा करून मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता.
तर शहरालगत असलेल्या ब्राम्हणी फाट्यावर सावर्ला येथील २१ वर्षीय रोजंदारीवर काम करणाऱ्या अनिकेत संजय तुरणकर याने विषारी द्रव्य प्राशन केले. सदर बाब लोकांच्या लक्षात येताच त्याला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र अनिकेतची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते.One suicide after another in Vani area.
एकाच दिवशी आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या दोन घटना घडल्या असतांनाच रविवारी लालगुडा परिसरातील एका हॉटेल जवळ मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर मृतदेह शिरपूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या कुरई येथील विठ्ठल आनंदराव ठावरी ३० चा असल्याचे स्पष्ट झाले. वणी पोलिसांनी विठ्ठल चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता. विठ्ठल ने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आबई येथील घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे तर दोन घटनेचा तपास सध्यातरी वणी पोलिसांकडे आहे..One suicide after another in wani area
वणी तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. एकापाठोपाठ एक आत्महत्या होत आहे यात नैराश्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतच आहे.