वणी:-(रवी ढुमणे) Yavatmal
ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन ने सन्मान स्त्री शक्तीचा फाऊंडेशन च्या संस्थापिका किरण संजय देरकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भारतीय नारी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.Awarded the Kiran Derkar Bharatiya Nari Ratna Award by Samman Stree Shakticha Foundation.
देशातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांची दखल ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन घेत असते. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना गौरविण्यात येते. यावर्षी सुद्धा पुणे येथे ग्लोबल फाऊंडेशन ने विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

यात वणी क्षेत्रात सन्मान स्त्री शक्तीचा फाऊंडेशन ची स्थापना करून महिलांसाठी विविध उपक्रम राबवून विधवांना आधार देणाऱ्या स्त्री शक्ती फाऊंडेशन च्या संस्थापिका किरण संजय देरकर वणी(महाराष्ट्र) यांना ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन ने भारतीय नारी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.Kiran Sanjay Derkar Wani (Maharashtra) has been honored with the "Bharatiya Nari Ratna" award by the Global Scholars Foundation. सोबतच देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन ने पुणे येथील आयोजित कार्यक्रमात पदव्या देऊन गौरविण्यात आले आहे. किरण देरकर यांनी सन्मान स्त्री शक्तीचा फाऊंडेशन च्या उपक्रमातून वाण आरोग्याचे, विधवा महिलांना शिवण यंत्र भेट, आदी उपक्रम राबविले असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन ने भारतीय नारी रत्न पुरस्कार प्रदान केला आहे.Awarded the Kiran Derkar Bharatiya Nari Ratna Award by Samman Stree Shakticha Foundation.
पुरस्कार समर्पित. ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन ने आमच्या कार्याची दखल घेत भारतीय नारी रत्न हा पुरस्कार दिला आहे. त्यासाठी "सन्मान स्त्री शक्तीचा" फाउंडेशन च्या वतीने मी आभार मानते व हा पुरस्कार माझ्या सोबत अहोरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व सन्माननीय जिवलग सखींना तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच आमच्या कार्याचे कौतुक करीत माझ्यावर जिवापाड प्रेम करुन माझी प्रेरणा बनणाऱ्या व मला प्रत्येक क्षेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या माझ्या कुटुंबातील सर्व सन्माननीय सदस्यांना, आमच्या कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व सन्माननीय समाज बांधवांना व सन्माननीय सर्व प्रिय विधवा सखींना मी हा पुरस्कार समर्पित करते. आणि सर्वांच्या हक्क-अधिकार-न्याय - सन्मान व विकासासाठी कायम कटिबद्ध राहील.
किरण संजय देरकर
संस्थापिका सन्मान स्त्री शक्तीचा फाऊंडेशन