-->

संजय देरकरांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक.Sanjay Derkar held a meeting of workers.

0


संगिनी न्युज wani yavatmal


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी शिवसेनेचे पदाधिकारी व त्यांचे निगडित कार्यकर्त्यांची बैठक १५ एप्रिल ला त्यांच्या निवासस्थानी घेऊन इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना निवडून देण्यासाठी घेतली होती.
इंडिया आघाडीचे घटक पक्ष अनभिज्ञ


संजय देरकरांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक

सध्या लोकसभा निवडणूकीचे पडघम जोरात वाजणे सुरू आहे. ग्रामीण भागात जनतेने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची खरी बाजू घटक पक्ष व जनतेनी उचलली आहे. यात काँग्रेस पक्षाचे नेते फक्त उहापोह करतांना दिसत आहे. वास्तविक पाहता ही निवडणूकच जनतेने आणि घटक पक्षाने देशहितासाठी घेतली असतांना ज्या पक्षाने उमेदवारी दिली, त्याच पक्षाचे पदाधिकारी मिरवत असल्याचे चित्र दिसत आहे.Sanjay Derkar held a meeting of workers.

याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी त्यांच्या जुन्या सवंगाड्यांना बैठकीचे निमंत्रण देत १५ एप्रिल ला त्यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिवसेनेचे दीपक कोकास, सुधीर थेरे,राजू तुरणकर, अजिंक्य शेंडे,प्रवीण खानझोडे, विनोद ढुमणे,बबलू भाई,सह शिवसैनिक व संजय देरकरांचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

देशाचे संविधान वाचविण्यासाठी हीच लढाई


आपल्या देशावर सध्या चालू असलेली हुकूमशाही गाडण्यासाठी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले ते आणि आपले गोरगरीब, शेतकरी, सामान्य जनतेला वाचविण्यासाठी महाविकास आघाडीच्या चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना निवडून देण्याची गरज आहे. त्यासाठी आपण आपल्या स्तरावरून होईल तितके प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी उपस्थित असलेल्या पदाधिकारी,व कार्यकर्त्यांना केले.


इंडिया आघाडीचे घटक पक्ष अनभिज्ञ


सध्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्यासाठी घटक पक्ष जोमाने प्रयत्न करीत आहेत. मात्र काँग्रेस चे नेते पुढारी जणू ही निवडणूक काँग्रेस पक्षाचे उमेदवार असल्यासारखे वावरतांना दिसते आहे. घटक पक्षाची मिटिंग सुद्धा बोलावून त्यांना बळ कसे देता येईल याबाबत अद्याप काँग्रेस पुढाऱ्यांचे नियोजन नसल्याचे बघायला मिळते आहे. यात काँग्रेसचे पुढारी केवळ मोठेपणात व्यस्त आहे. पण घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ही लढाई आपलीच असल्याने जोमात प्रचार करतांना दिसते आहे.
शिवसेनेची रॅली




शिवसेनेची रॅली

वणीत इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थनार्थ शिवसेनेची रॅली साई मंदिर जवळून निघाली होती. प्रसंगी यात अनेक निष्ठावंत शिवसैनिकांची उपस्थिती दुर्मिळ असल्याचे चित्र बघायला मिळाले. यामागे कोणते कारण असेल यावर चिंतन करणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top