Sangini news wani yawatmal
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना विकासाच्या नावावर मते मागण्यासाठी अभिनेत्रींना आणावे लागते आहे. यातच गेल्या दहा वर्षात त्यांनी कोणताही विकास केला नसल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना सिनेकलावंतांना प्रचारात आणावे लागते आहे.असा सवाल मतदारांनी केला आहे.
रविना नंतर आता प्राजक्ता?दहा वर्षात काय केलं ते सांगा. जनतेचा सवाल?
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व त्यांच्या मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांपासून जनतेला भ्रमात टाकत केवळ गाजर दाखविले आहे. यातच शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मोदी सरकार देत आहे. त्यांचे आभार माना असे सांगत शेतकरी जणू सरकारकडे भिकच मागत असल्याचे त्यांनी वृत्तवाहिन्यांवर बोलले आहे. एवढेच नव्हे तर बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारे उद्गार त्यांनी अलीकडेच काढून स्वतःची प्रतिमा काय आहे ते सिद्ध केले आहे. गेल्या दहा वर्षात शेतकरी,सामान्य जनतेसाठी काय केले असा सवाल मतदार उपस्थित करीत आहेत.Prajakta now after Raveena?Tell me what you have done in ten years. Public question
३३कोटी वृक्ष लागवड केली असे सांगत आजवर प्रदूषणात अव्वल असलेल्या त्यांच्याच मतदारसंघात किती वृक्ष लागवड केली आणि किती जगली याचा हिशोब लागता लागेना. तरीसुद्धा मेरी मुर्गी की एक ही टांग अशी बतावणी करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजेच विकासाच्या नावावर मते मागता येत नसल्याने सध्या त्यांनी सिनेकलावंतांना प्रचारात उतरविले आहे. १५ एप्रिल ला वणी विधानसभा क्षेत्रात त्यांनी चक्क रविना टंडन या सिने अभिनेत्री ला शहरात फिरवत रोड शो केला खरा. मात्र मतदारांनी याकडे जणू पाठच फिरविल्याचे चित्र दिसले. सगळीकडे भाजपला प्रखर विरोध,असल्याने सध्यातरी चंद्रपूर मतदारसंघात वनमंत्र्यांची डाळ शिजत नसल्याने विकासाच्या नावावर मते मागण्याऐवजी त्यांनी सिनेकलावंतांना प्रचारात उतरविले असल्याचे मतदार जणू स्पष्टच बोलायला लागले आहेत.
रविना टंडन नंतर आता प्राजक्ता माळी
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सिने कलावंत सुनील शेट्टी,रविना टंडन आणि आता हास्य जत्रा फेम प्राजक्ता माळी ला प्रचारात उतरविले आहे. आज १६ एप्रिल ला सायंकाळी आर्णी येथे सिने कलावंत प्राजक्ता माळी चा रोड शो असल्याचे उमेदवारांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून माहिती दिली आहे. एकूणच विकासकामे न सांगता मतदारांना आकर्षित करण्याचे फंडे त्यांनी सुरू केल्याचे आरोप जनतेतून होते आहे.

-min.jpg)