-->

यवतमाळ गुन्हे शाखेची मोठी कारवाई. ६८ लाखाचा मुद्देमाल जप्तYavatmal Crime Branch's big action. 68 lakh worth of goods seized

0






Sangini News :- Wani-Yavatmal



यवतमाळ- दारव्हा रोडवरील घाटात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आयशर वाहनासह एकास ताब्यात घेवून केला ६८ लाख,३७ हजार,सहाशे रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त जप्त करीत कारवाई केली आहे.

यवतमाळ गुन्हे शाखेची मोठी कारवाई. ६८ लाखाचा मुद्देमाल जप्त




यवतमाळ जिल्हयातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध सुगंधित तंबाखू वाहतूक,साठवणूक करणाऱ्यांचा शोध घेत होते. यातच गुप्त बतमीदारांकडून सुगंधित तंबाखू एका वाहनात भरून येत असल्याची माहिती पथकाला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आयशर वाहनात भरून असलेला ५३ लाखाचा सुगंधीत तंबाखू जप्त करून मोठी कारवाई केली आहे.Yavatmal Crime Branch's big action. 68 lakh worth of goods seized

यवतमाळ गुन्हे शाखेची मोठी कारवाई. ६८ लाखाचा मुद्देमाल जप्त


शनिवार दि. ६ मार्च ला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु भरुन असलेले एक आयशर वाहन दारव्हा रोडने यवतमाळ कडे येणार आहे. अशा माहीतीवरुन पथकाने प्राप्त माहितीची शहानिशा करुन यवतमाळ दारव्हा रोडवरील घाटात चिद्दरवार कंस्ट्रक्शन समोर सापळा रचून असतांना माहिती प्रमाणे संशयीत आयशर वाहन क्रमांक एम.एच. 40 एके 7045 हे येतांना दिसले. आणि दबा धरून असलेले पथक सक्रिय झाले. पोलीस पथकाच्या मदतीने वाहन थांबवून सोबत असलेल्या अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचासमक्ष सदर वाहनातील चालकास नाव विचारले असता त्याने आपले नांव तोरन सुखराम गहाणे वय 25 वर्षे, रा. वार्ड क्र. 3 मु. उचापुर, पोस्ट काकोडी ता. देवरी जि. गोंदीया असे असल्याचे सांगीतल्याने पंचासमक्ष त्याचे वाहनाची झडती घेतली असता वाहनात 1) सुगंधीत तंबाखु (मजा 108) 50 ग्राम वजनाचे चे 2000 डबे, 2) सुगंधीत तंबाखु (मजा 108) 200 ग्राम वजनाचे चे 2800 डबे, 3) सुगंधीत तंबाखु (इगल 108) 40 ग्राम वजनाचे पाउच असलेले 06 पोते, 4) सुगंधीत तंबाखु (इगल 108) 200 ग्राम वजनाचे 1600 मोठे पॅकेट, 5) सुगंधीत तंबाखु (विनालेबल सिल्वर कोटींग) 3 किलो ग्राम वजनाचे 500 पॅकेट असा एकूण 52,37,600 रुपयाचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल व आयशर वाहन क्रमाक एम.एच. 40 एके 7045 असा एकूण 68,37,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे अन्न सुरक्षा मानके व भा.द.वि कायदयाचे विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपी तोरन सुखराम गहाणे वय 25 वर्षे, रा. वार्ड क्र. 3 मु. उचापुर, पोस्ट काकोडी ता.

देवरी जि. गोंदीया व जप्त मुद्देमाल पो.स्टे. यवतमाळ ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात, आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा, सहा. पोलीस निरीक्षक, अमोल मुडे, पोउपनि राम कांडुरे, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top