आमदारांच्या गावातच भाजपला सुरुंग
BJP has a tunnel in the village of MLAs
Sangini News(Ravi Dhumne)
वणी विधानसभेचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या गावातील भाजपच्या युवकांनी सुरुंग लावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांचे निवासस्थानी प्रवेश घेतला आहे.
झरी तालुक्यातील भाजपच्या युवकांचा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. देशातील नव्हे तर राज्यातील जनता या शासनाला कंटाळली आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या प्रतिभा धानोरकर व भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात खरी लढत होणार आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजपच्या सरकारला कंटाळून अनेक लोक योग्य सरकारच्या दिशेने वाटचाल करायला लागल्याचे बघायला मिळते आहे.मागील महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील संजय देरकर यांची विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. प्रवेशाची रणधुमाळी सुरू असतानाच विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या लिंगटी गावातील भाजपच्या युवक तरुणांनी भाजपला सुरुंग लावत परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेतला आहे.
शिवसेनेचे निष्ठावंत लागले कामाला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत असलेले जिल्हा सहसंपर्क प्रमुख संतोष माहूरे, व ग्रा.प.सदस्य जगदीश बद्दमवार तसेच पवन काळे सामाजिक कार्यकर्ते , माजी सरपंच ब्रम्हनंद येलटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला आहे.
युवकांच्या प्रवेशाने भाजपला धक्का
आमदारांच्या झरी-जामनी तालुक्यातील युवकांनी पक्षप्रवेश केल्याने भाजपला या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान फार मोठा धक्का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार धक्का दिल्याने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचे पारडे आज जड होताना दिसत आहे . अशाच प्रकारचे लोकशाही संवर्धनासाठी युवकांचा या महाविकास आघाडीला व इंडिया गटबंधनला पाठिंबा देण्यासाठी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सक्रिय काम करण्यासाठी युवकांचे मोठ्या प्रमाणात भविष्यात पक्षप्रवेश होणार आहे.
पक्ष प्रवेशावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख संतोष माहूरे, उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे,माजी उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, वणी तालुका प्रमुख रवी बोढेकर, वणी शहर प्रमुख सुधिर थेरे, युवासेनेचे अजिंक्य शेंडे सह प्रवेश घेणारे झरी जामनी तालुक्यातील तरुण व लिंगटी येथील युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

-min.jpg)