-->

हास्य कलाकार श्याम रंगीला चा उमेदवारी अर्ज रद्द Comedian Shyam Rangeela's candidature canceled

0


हास्य कलाकार श्याम रंगीला चा उमेदवारी अर्ज रद्द 


Sangini News


समाज माध्यमांवर हास्य कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्याम 1रंगीला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करण्याआधी त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले होते. शेवटी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला होता. मात्र त्यांनी शपथपत्र दाखल केले नसल्याचे कारण दाखवत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे.Comedian Shyam Rangeela's candidature canceled

हास्य कलाकार श्याम रंगीला चा उमेदवारी अर्ज रद्द Comedian Shyam Rangeela's candidature canceled



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुबेहूब नक्कल करणारा हास्य कलाकार श्याम रंगीला यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहण्याची सूतोवाच केले होते. दरम्यान त्यांना जनतेकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शाम सुंदर यांना बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले होते. प्रथमतः शाम यांचा अर्जच स्वीकारीत नसल्याचा आरोप ही शाम रंगीला यांनी X या समाज माध्यमातून केला होता. प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्ज भरेपर्यंत कोणालाही आत प्रवेश दिला जात नसल्याचे शाम रंगीला यांनी नमूद केले होते.

अर्ज भरतांना आल्या अनेक अडचणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शाम रंगीला हे अर्ज भरण्यासाठी कार्यालयात गेले होते. प्रथम त्यांचा अर्ज स्वीकारत नव्हते. प्रसंगी शाम रंगीला यांनी तात्काळ निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्यानंतर त्यांचा १४ मे रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला.

उमेदवारी अर्ज रद्द झाल्यावर बोलले शाम रंगीला


उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर शाम रंगीला यांनी X वर व्हिडीओ टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रसंगी एकूण २७ अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र निवडणूक विभागाने ३२ अर्ज रद्द केले आहे. निवडणूक आयोगावर हसू येते असे शाम रंगीला म्हणाले. परत एक पोस्ट करत म्हणाले की, मला निवडणूक लढण्यासाठी मज्जाव होता. हे जाणून होतो. तरीसुद्धा मन जरी दुखले असेल पण हिम्मत हारली नाही.

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हास्य कलाकार शाम रंगीला यांनी आव्हान दिले होते. मात्र विविध कारणे पुढे करून त्यांचा उमेदवारी अर्ज जाणीवपूर्वक रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top