-->

मोदींच्या भाषणावेळी तरुण शेतकऱ्याची नारेबाजी Young farmers shout slogans during Modi's speech

0


मोदींच्या भाषणावेळी तरुण शेतकऱ्याची नारेबाजी


Sangini news


दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने नारेबाजी करताच त्याला पोलिसांनी सभेतून बाहेर काढले.
मोदींच्या भाषणावेळी तरुण शेतकऱ्याची नारेबाजी Young farmers shout slogans during Modi's speech



दिंडोरी येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करीत असताना किरण सानप या तरुण शेतकऱ्याने "कांद्याच्या मुद्द्यावर बोला" असे म्हणत नारेबाजी करीत असताना पोलिसांनी किरण सानप या तरुण शेतकऱ्याला सभेतून बाहेर काढले. तरीसुद्धा किरण मंडपाबाहेर सरकारचा निषेध करीतच होता. Young farmers shout slogans during Modi's speech

आता मोदीजी १० वर्षांपूर्वी लोकांना दिलेली वचनं पूर्ण करू न शकल्याने त्यांना भुलवण्यासाठी अल्पसंख्यांकांच्या मुद्यावर बोलत होते. मोदींच्या भाषणात सामान्य शेतक-यांच्या समस्यांना स्थान नाही, पण तुष्टीकरणाच्या मुद्यांना आहे.

     कांद्याने शेतक-यांना रडवलं असताना सरकार शेतक-यांच्या मुद्यांबाबत इतकं निगरगट्ट कसं काय होऊ शकतं? कांद्याचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे.निर्यात बंदी मुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाहीये.अश्यावेळी किरण सानप सारखं तरुण जर पंतप्रधानांना जाब विचारत असेल तर काय चुकलं त्याच..? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमातून केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top